Best Selling SUV Tata Nexon: भारतीय वाहन बाजारात अलिकडच्या काळात एसयूव्हींची लोकप्रियता खूप वाढली आहे. भारतीय ग्राहक आता मोठ्या प्रमाणात एसयूव्हींची विक्री करू लागले आहेत. एसयूव्हींच्या सेगमेंटमध्ये भारतात टाटा मोटर्सचा दबदबा निर्माण झाला आहे. टाटा कंपनीने सादर केलेल्या एसयूव्हीने ग्राहकांना वेड लावले आहे. देशात जास्तीत-जास्त विक्री उप-4 मीटर SUV ची आहे. त्यानंतर कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. Tata Nexon (Sub-4 मीटर SUV) ची डिसेंबर २०२२ मध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. मारुती ब्रेझा, टाटा पंच आणि ह्युंदाई क्रेटा सारख्या सर्व एसयूव्ही विक्रीच्या बाबतीत मागे आहेत. Tata Nexon च्या एकूण १२,०५३ युनिट्सची विक्री झाली आहे.

त्याचवेळी, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मारुती ब्रेझाच्या एकूण ११,२०० युनिट्स, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या टाटा पंचच्या एकूण १०,५८६ युनिट्स आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या ह्युंदाई क्रेटाच्या एकूण १०,२०५ युनिट्सची विक्री झाली आहे. नोव्‍हेंबर २०२२ मध्‍ये नेक्‍सॉन ही दुसरी सर्वाधिक विकली जाणारी कार देखील होती, जेव्हा एकूण १५,८७१ युनिट्सची विक्री झाली होती.

(हे ही वाचा : देशातील ‘या’ लोकप्रिय कार खरेदी करणं झालं महाग; कंपनीने केली किंमतीत ‘इतकी’ वाढ )

Tata Nexon एसयूव्हीमध्ये काय आहे खास?

टाटा नेक्सॉनचं डिझाईन ग्राहकांच्या पसंतीस उतरलं आहे. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये तुम्हाला सनरूफ, पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय देण्यात आले आहेत, जे ऑटो ट्रांसमिशनसह येतात. Tata Nexon मध्ये १२०hp पॉवर आणि १७०Nm साठी १.२-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. तर १.५-लीटर डिझेल इंजिन ११०hp आणि २६०Nm सह बनवण्यात आलं आहे. दोन्ही इंजिन ६-स्पीड मॅनुअल किंवा एएमटीसह उपलब्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Tata Nexon एसयूव्ही किंमत

Tata Nexon ची किंमत रेंज ७.७० लाख रुपये ते १४.१८ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. रेग्युलर व्हेरिएंट्स व्यतिरिक्त, हे डार्क एडिशन, काझीरंगा एडिशन आणि जेट एडिशनमध्ये देखील येते.