scorecardresearch

‘या’ तारखेला Tata Tiago EV ची एन्ट्री, सर्वात कमी किंमतीत मोठी ड्रायव्हिंग रेंज मिळू शकते

Tata Tiago EV ही हॅचबॅक कार Tata Tiago चा नवीन इलेक्ट्रिक अवतार जागतिक स्तरावर भेटीला येणार आहे.

‘या’ तारखेला Tata Tiago EV ची एन्ट्री, सर्वात कमी किंमतीत मोठी ड्रायव्हिंग रेंज मिळू शकते
(फोटो- INDIAN AUTOS BLOG)

Tata Motors येत्या २८ सप्टेंबर २०२२ रोजी Tata Tiago EV ही हॅचबॅक कार Tata Tiago चा नवीन इलेक्ट्रिक अवतार जागतिक स्तरावर भेटीला येणार आहे. लॉंच केल्यानंतर ती देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार होण्याचा मान मिळवेल.

टाटा मोटर्सने काही काळापूर्वी इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये आपल्या नवीन कार लॉंच करण्याविषयी बोलले होते. पहिल्या टप्प्यात कंपनीची सध्याची इलेक्ट्रिक कार टाटा टिगोर ईव्हीचे मॅक्स मॉडेल सादर करण्यात आले. यानंतर आता कंपनी आपल्या लोकप्रिय हॅचबॅकचे इलेक्ट्रिक व्हर्जन सादर करणार आहे.

कंपनीने अद्याप Tata Tiago EV च्या पॉवर ट्रेन आणि फीचर्सबद्दल कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही, परंतु अशी अपेक्षा आहे की कंपनी लॉंचपूर्वी या कारच्या पॉवरट्रेनसह मेन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा एक टीझर जारी करू शकते.

आणखी वाचा : Electric Scooter Buying Tips and Tricks: इलेक्ट्रिक स्कूटर घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं

अहवालानुसार, टाटा मोटर्स या Tiago EV मध्ये तेच प्रगत ziptron तंत्रज्ञान वापरणार आहे जे Tata Tigor EV मध्ये वापरले गेले आहे. झिपट्रॉन तंत्रज्ञानामध्ये परमानेंट मैग्नेट सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटर वापरली जाते. या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, ते ७४ Bhp पॉवर आणि १७० Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. यामध्ये कंपनीने २६ KwH क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे.

या बॅटरी पॅकमधून उपलब्ध असलेल्या ड्रायव्हिंग रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ३०२ किमीची ड्रायव्हिंग रेंज उपलब्ध आहे. याशिवाय, या बॅटरी पॅकवर कार ५.७ सेकंदात ० ते ६० किमी प्रति तासाचा वेग पकडू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी टाटा टियागो ईव्हीमध्येही हीच पॉवरट्रेन ऑफर करणार आहे.

आणखी वाचा : Okaya Faast इलेक्ट्रिक स्कूटर एकाच चार्जमध्ये मोठी रेंज देते, किंमत जाणून घ्या

Tata Tiago EV चे फीचर्स कंपनीने उघड केलेली नाहीत. परंतु त्याच्या सेफ्टी फीचर्सबाबत अपडेटनुसार, Tata Tigor EV ला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे, त्यानुसार ही इलेक्ट्रिक हॅचबॅक सर्वात सुरक्षित कार आहे.

Tata Tiago EV ची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, कंपनी या इलेक्ट्रिक हॅचबॅकची सुरुवातीची किंमत १०.५० लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) सह लॉंच करू शकते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या