टेस्लाच्या गाड्यांबाबत जगभरातील ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. टेस्लाने इलेक्ट्रिक कार विक्रीतून २०२१ या वर्षात ५ अब्ज डॉलर्स कमावले. तर २०२० या वर्षाती ही कमाई ३.४७ अब्ज डॉलर्स इतकी होती. टेस्लाने गेल्या वर्षी ९,३६,००० वाहनं वितरीत केली असून २०२० च्या तुलनेत दुप्पट आहे. असं असताना टेस्लाने अमेरिकेतील ९४७ इलेक्ट्रीक कार परत मागवल्या आहेत. रीअरव्ह्यू इमेज डिस्प्लेमध्ये विलंब होत असल्याने इलेक्ट्रिक वाहन निर्मात्याने तीन इलेक्ट्रिक कार मॉडेल्स परत मागवण्यास सुरुवात केली आहे. नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार, कार रिव्हर्स घेताना रीअरव्यू इमेज दिसण्यास उशीर होत होता.

टेस्लाच्या रिकॉलमध्ये २०१७ आणि २०२० दरम्यान उत्पादित मॉडेल ३ इव्ही, २०१८ आणि २०१९ दरम्यान उत्पादित मॉडेल एस कार आणि त्याच कालावधीत विकल्या गेलेल्या मॉडेल X चा समावेश आहे. या इलेक्ट्रिक कार ऑटोपायलट कॉम्प्युटर २.५ ने सुसज्ज आहेत. टेस्लाने सांगितले की, “समस्येचे निराकरण करण्यासाठी ओव्हर-द-एअर सॉफ्टवेअर अपडेट करेल.”

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
Revenge Porn in Khamgaon
खामगावात ‘रिव्हेंज पॉर्न’चे व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ, सायबर विभागाची करडी नजर

गाडीचा टायर जुना झाला की नाही? आता लगेच कळणार, CEAT नं आणलं कलर इंडिकेटर्स मार्क

टेस्ला कार भारतात कधी येणार?
टेस्ला आणि सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून आयात शुल्कावरून चर्चा सुरु आहे. “भारतात कार लाँच करण्यात अजूनही अडचणी आहेत”, असं टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी जानेवारी महिन्यात सांगितलं होतं. टेस्लाला आतापर्यंत भारतातील चाचणी एजन्सींकडून सात कारसाठी मंजुरी मिळाली आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीने पंतप्रधान कार्यालयाकडे आयात कर कमी करण्याची विनंती केली होती. मात्र स्थानिक कार उत्पादक कंपन्यांनी टेस्लाच्या विनंतीला विरोध केला आहे. असा निर्णय घेतल्यासं देशांतर्गत उत्पादनातील गुंतवणुकीला धक्का बसेल असं सांगण्यात येत आहे.