Why Tyres Are Always Black In Colour: रस्त्यावर तुम्ही ट्रक, कार, बाईक अशा सर्व प्रकारची वाहने पाहिली असतील. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला का, गाडी कुठल्याही प्रकारची असली तरीही तिचं टायर काळ्या रंगाचं (Tyre Colour Black) का असतं? लहान कार असो वा मोठा ट्रक, सर्व प्रकारच्या वाहनांचे टायर काळे का असतात, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर यामागील विज्ञान जाणून घेऊया.

…म्हणून वाहनांचे टायर काळ्या रंगाचे असतात

कारचे टायर हे रबराचे बनलेले असतात हे तुम्हाला माहीत असेलच. रबराचा रंग राखाडी असला तरी रबर टायर बनवण्याच्या प्रक्रियेत त्याचा रंग काळा होतो. काळे टायर जास्त काळ टिकतात, त्यामुळे टायरचा रंग काळा असतो. वास्तविक, टायर बनवण्यासाठी रबरमध्ये ब्लॅक कार्बन आणि सल्फर मिसळले जातात. यामुळे टायरचा रंग काळा होतो.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण

(हे ही वाचा : Tyre Tips: कार-बाईक चालवताय, रस्त्यावर सुसाट धावणार तुमची वाहने, ‘या’ टायर्सबद्दल माहितेय का? वाचा सविस्तर )

नैसर्गिक रबर खूप मऊ आहे. टायर बनवण्यासाठी ते कडक केले जाते. कार्बन आणि सल्फर फक्त ते कडक करण्यासाठी त्यात मिसळले जाते. यामुळेच टायरचा रंग काळा होतो. जर रबरमध्ये कार्बन आणि सल्फर मिसळले नाही, तर त्यापासून बनवलेले टायर अत्यंत निकृष्ट दर्जाचे असतील. दुसरीकडे, कमी वापराने हे टायर खराब होतील. यामुळेच टायर रंगीत नसून ते काळ्या रंगाचे असतात.

एकेकाळी टायर होते पांढरे

तब्बल १२५ वर्षांपूर्वी टायरचा रंग पांढरा असायचा. कारण टायर बनवण्यासाठी वापरले जाणारे रबर दुधाळ पांढरे असते. पण सध्या टायर बनवण्यासाठी इतर साहित्य वापरले जाते. वास्तविक, जुन्या काळातील टायर वाहनाचा भार सांभाळून रस्त्यावरून वेगाने जाण्याइतके मजबूत नव्हते.