scorecardresearch

…म्हणून तुमच्या नवीन कारची डिलिव्हरी वेळेवर झाली नाही; ‘या’ कंपनीच्या SUV साठी ग्राहक रांगेत

तुम्ही जर नवी कार घ्यायला गेलात तर, तुम्हाला कारच्या डिलिव्हरीसाठी वाट पाहावी लागते काय?…

Car Delivery Reason
कारची डिलिव्हरी वेळेवर होत नाही आहे? (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Car Delivery Reason: वाहन उद्योग विविध प्रश्नांच्या फेऱ्यात अडकल्याचे दिसून येत होते. यामध्ये चिपची कमतरता, कच्च्या मालाचा कमी असणारा पुरवठा यासह विविध कंपन्यांनी आपल्या वाहन मॉडेल्समध्ये केलेले बदल यामुळे देशातील बहुतांश कार कंपन्या वेळेवर डिलिव्हरी करू शकल्या नसल्याची माहिती आहे. ही बातमी अशा लोकांसाठी खूप महत्त्वाची आहे जे कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत किंवा ती खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. कारण यावेळी जवळपास सर्वच ऑटोमोबाईल कंपन्यांना सेमीकंडक्टरच्या कमतरतेचा सामना करावा लागत असून पुढील काही महिने या टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आता जर तुम्ही गाडी घेण्यासाठी गेलात तर तुम्हाला गाडीच्या डिलिव्हरीसाठी बराच वेळ वाट पाहावी लागेल.

‘या’ कार कंपनीकडे सर्वाधिक आहे बुकिंग

जर तुमची आवडती कार मारुतीची असेल तर थोडा जास्त वेळ लागेल. कारण सध्या मारुतीकडे सर्वाधिक गाड्यांचे बुकिंग आहे. ज्यांची संख्या ३.६९ लाख युनिट आहे. दुसरीकडे, जर आपण मॉडेलनुसार बोललो तर, कंपनीकडे मारुती एर्टिगासाठी सर्वाधिक बुकिंग आहेत. ज्याची संख्या ९४,००० युनिट्स आहे. याशिवाय ब्रेझाच्या ६१,५०० युनिट्स, ग्रँड विटाराच्या ३७,००० युनिट्स, जिमनीच्या २२,००० युनिट्स आणि फ्रँक्सच्या १२,००० युनिट्स आहेत. चिपच्या कमतरतेमुळे मारुतीला गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ पर्यंत सुमारे ५०,००० युनिट्सचे नुकसान झाले आहे.

(हे ही वाचा : Mahindra च्या ग्राहकांना झटका! सर्वात स्वस्त Mahindra Thar झाली महाग, आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे )

‘इतका’ आहे प्रतीक्षा कालावधी

मारुतीच्या एर्टिगा ब्रेझा आणि टूर-एम सारख्या जास्त मागणी असलेल्या कारच्या खरेदीवर १० महिन्यांपर्यंत प्रतीक्षा कालावधी दिला जात आहे. त्याचवेळी, मारुतीच्या सेलेरियो, एस-प्रेसो, टूर एच3, अल्टो के 10, स्विफ्ट आणि डिझायर कारवर तीन महिन्यांपर्यंत प्रतीक्षा कालावधी दिला जात आहे. ज्यामध्ये सेलेरियो ही सर्वात कमी प्रतीक्षा कालावधी असलेली कार आहे.

…म्हणूनच आहे सेमीकंडक्टरची कमतरता

आजकालच्या कार्समध्ये बरेच हायटेक फीचर्स दिले जातात. यासाठी सेमीकंडक्टर फार आवश्यक असते. देशांतर्गत बाजारपेठेत मारुतीच्या वाहनांना सर्वाधिक पसंती दिली जाते. यासोबतच मारुतीने ऑटो एक्सपोमध्ये आपल्या दोन कार सादर केल्या होत्या, ज्यांचे ग्राहकांनी लगेच बुकिंग करण्यास सुरुवात केली. यामुळेच मारुतीला सेमीकंडक्टरचा तुटवडा भासत आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 13:58 IST