10 best selling cars in October 2022 : देशात सनासुदीच्या दिवासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची विक्री झाली. दिवाळीला अनेक कार कंपन्यांनी आपल्या वाहनांवर मोठी सूट दिली होती. याचा फायदा ग्राहकांना मिळाला. ऑक्टोबर महिना वाहन कंपन्यांसाठी लाभदायक ठरला. ऑक्टोबर महिन्यात ३ लाख ३६ हजार २९८ युनिट्सची विक्री झाली आहे. २०२१ साली याच महिन्यात २ लाख ६० हजार १६२ युनिट्सची विक्री झाली होती. ऑक्टोबर महिन्यात टॉप बेस्ट सेलिंग कार्स कोणत्या होत्या? विक्रीच्या बाबतीत कोणत्या वाहनाने पहिले स्थान पटकवले? याबाबत जाणून घेऊया.

१) मारुती सुझुकी आल्टो

ऑक्टोबर महिन्यात कंपनीने मारुती सुझुकी आल्टोच्या २१ हजार २६० युनिट्सची विक्री केली. यंदा विक्रीमध्ये २२ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात १७ हजार ३८९ युनिट्सची विक्री झाली होती. नवीन लाँच झालेल्या आल्टो के १० मुळे कंपनीला हे यश मिळाले.

(टाटाने नेक्सॉनचे ‘हे’ 6 व्हेरिएंट केले बंद, मिळणार नवा पर्याय)

२) मारुती सुझुकी वेगन आर

सर्वाधिक कार विक्रीमध्ये दुसरे स्थान वेगन आरने पटकवले. कंपनीने १७ हजार ९४५ युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षी १२ हजार ३३५ युनिट्सची विक्री झाली होती. विक्रीमध्ये ४५ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

३) मारुती सुझुकी स्विफ्ट

मारुतीची लोकप्रिय कार स्विफ्ट विक्रीच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर होती. ऑक्टोबर महिन्यात या वाहनाच्या १७ हजार २३१ युनिट्सची विक्री झाली असून ८८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. वेगन आर देशातील तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. सीएनजी व्हेरिएंट लाँच झाल्यामुळे वृद्धीला वेग आल्याचे समजले आहे.

४) मारुती सुझुकी बलेनो

या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बलेनोच्या १७ हजार १४९ युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी या वाहनाच्या १५ हजार ५७३ युनिट्सची विक्री झाली होती. विक्रीमध्ये १० टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

(वाहन विकण्यापूर्वी ‘हे’ काम आवर्जून करा, मोठे आर्थिक नुकसान टळेल)

५) टाटा नेक्सॉन

टाटाने ऑक्टोबर महिन्यात नेक्सॉनच्या १३ हजार ७६७ युनिट्सची विक्री केली. ऑक्टोबर २०२१ मध्ये १० हजार ९६ युनिट्सची विक्री झाली होती. विक्रीमध्ये ३६ टक्क्यांची वाढ दिसून आली.

६) मारुती सुझुकी डिझायर

ऑक्टोबर २०२२ मध्ये मारुती सुझुकीने डिझायरच्या १२ हजार ३२१ युनिट्सची विक्री केली. २०२१ मध्ये याच महिन्यात ८ हजार ७७ वाहनांची विक्री झाली होती. डिझायरच्या विक्रीमध्ये ५३ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

७) ह्युंडाई क्रेटा

ह्युंडाईने ऑक्टोबर २०२२ मध्ये क्रेटाच्या ११ हजार ८८० युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने केवळ ६ हजार ४५५ युनिट्सची विक्री केली होती.

(आनंदाची बातमी! केवळ ४ लाखांमध्ये मिळत आहे MAHINDRA THAR, जाणून घ्या ऑफर)

८) टाटा पंच

टाटाने ऑक्टोबर २०२२ मध्ये पंचचे १० हजार ९८२ युनिट्स विकलेत. गेल्या वर्षी याच महिन्यात ८ हजार ४५३ युनिट्सची विक्री झाली होती.

९) मारुती सुझुकी इर्टिगा

या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मारुती इर्टिगाच्या १० हजार ४९४ युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात आकडा १२ हजार ९२३ होता. वाहनाच्या विक्रीमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे.

१०) मारुती सुझुकी विटारा ब्रेझा

मारुती सुझुकीने या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ९ हजार ९४१ युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ८ हजार ३२ युनिट्सची विक्री झाली होती. वाहनाच्या विक्रीमध्ये २४ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. ९ हजार ९४१ युनिट्सच्या विक्रीसह हे वाहन सर्वाधिक विक्रीच्या बाबतीत दहाव्या स्थानावर आहे.