स्पोर्ट्स बाईक भारतातील तरुण रायडर्सना नेहमीच आकर्षक करतात. गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील स्पोर्ट्स बाईक्सची बाजारपेठेत लक्षणीय वाढ झाली आहे. जर तुम्ही स्पोर्ट्स बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला सध्या भारतात उपल्बध असलेल्या आणि सगळ्यात स्वस्त स्पोर्ट्स बाईकची यादी सांगणार आहोत, ज्या तुम्ही खरेदी करून प्रवासाचा आनंद लुटू शकता.

तर सध्या भारतात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या टॉप पाच सर्वात स्वस्त स्पोर्ट्स बाईक्स पाहू.

pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती
72 meter tall flyover viral video
Fact check : गुजरातमध्ये बांधलाय ७२ मीटर उंचीचा ब्रिज? Viral होणारा व्हिडीओ नेमका कुठला?

१. सुझुकी जिक्सर एसएफ (Suzuki Gixxer SF) :

भारतात विक्रीसाठी असलेली सर्वात परवडणारी बाईक म्हणजे ‘सुझुकी जिक्सर एसएफ (Suzuki Gixxer SF); ज्याची किंमत १.३६ लाख रुपयांपासून सुरू होते . स्ट्रीट नेकेड जिक्सर 155 वर ( street naked Gixxer 155) आधारित, ही मोटारसायकल १५५ सीसी (155 cc) सिंगल-सिलेंडर, इंधन-इंजेक्टेड मोटारद्वारे परिपूर्ण आहे, जी १३.४ बिएचपी (13.4 bhp) आणि १३.८ एनएम (13.8 Nm) निर्मिती करते. हे इंजिन पाच-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

२. हिरो एक्स्ट्रीम २०० एस ४व्ही (Hero Xtreme 200S 4V) :

हिरो एक्स्ट्रीम २०० एस ४व्ही (Hero Xtreme 200s 4V-) जास्त लोकप्रिय नाही. पण, बाजारात सहज उपलबद्ध असणाऱ्या आणि परवडणाऱ्या स्पोर्ट्स बाईकपैकी एक नक्कीच आहे. तसेच गेल्या वर्षी या बाईकला एक्स प्लसकडून अपग्रेड करण्यात आलेले १९९.६ सीसी (199.6cc), सिंगल सिलेंडर, एअर/ऑईल- क्लूड, ४ व्हॉल्व्ह इंजिन मिळाले. तसेच ही बाईक आता ८,००० आरपीएम वर १८.९ बीएचपी आणि ६,५०० आरपीएमवर १७.३५ एनएमचा पीक टॉर्क आउट करते. तसेच ही बाईक एकाच प्रकारात उपलब्ध असून त्याची किंमत १.१६ लाख रुपये आहे.

३. यामाहा आर१५ (Yamaha R15) :

यामाहा आर१५ सर्वात आकर्षक स्पोर्ट्स बाईकपैकी एक आहे. यामाहा आर१५ जुन्या-जनरल आर १५ एस (R15S) आणि नवीन- जेन आर१५ वी ४.० (gen R15 V4.0) या दोन डेरिव्हेटिव्हजमध्ये उपलब्ध आहेत. तसेच आर १५ एसच्या (R15S) किंमती १.६६ लाख रुपयांपासून सुरू होतात, तर आर१५ वी ४.० (gen R15 V4.0) १.८२ लाख रुपयांपासून सुरू होतात. दोन्ही बाईक्स समान १५५ सीसी (155cc) , सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, एसओएचसी (SOHC), चार-व्हॉल्व्ह, व्हीव्हीए (VVA) प्रणालीसह इंधन-इंजेक्टेड इंजिनद्वारे परिपूर्ण आहेत. ही मोटार सहा-स्पीड गिअरबॉक्ससह जोडली गेली आहे. पण, या दोन्ही बाईक्सचे आउटपूट एकमेकांपेक्षा वेगळे आहे.

हेही वाचा…सणासुदीच्या ३० दिवसात ३.११ लाख लोकांनी खरेदी केली ‘ही’ बाईक; घेण्यासाठी शोरूम्समध्ये उसळली गर्दी

४. बजाज पल्सर आरएस२०० ( Bajaj Pulsar RS200) :

बजाज पल्सर आरएस२०० ची (RS200) किंमत १.७२ लाख रुपये आहे. ही बाईक केटीएम २०० ( KTM 200 ) अपग्रेड करण्यात आलेल्या १९९.५सीसी (199.5cc) इंधन-इंजेक्‍ट, चार-वाल्व्ह, लिक्विड-कूल्ड मोटारद्वारे परिपूर्ण आहे. पण, पल्सरमध्ये हे इंजिन ९७५० आरपीएम (9750 rpm) वर २४.२ बीएचपी (24.2 bhp) आणि ८,००० आरपीएम (8000 rpm) वर १८.७ एनएम (18.7 Nm) थोडेसे कमी आहे. हे १४०.८ किमी प्रतितास रेट केलेल्या टॉप स्पीडसह सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

५. केटीएम आरसी १२५ (KTM RC 125 ) :

केटीएम आरसी १२५ ची (RC 125) किंमत १.८९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. हे १२४ सीसी (124cc) सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिनद्वारे परिपूर्ण आहे, ज्यामध्ये एअरबॉक्ससारखे बदल करण्यात आले आहेत. तसेच बाईकचे इंजिन १४.३४ ( 14.34 ) बीएचपी आणि १२ (12 Nm ) एनएमचा पीक टॉर्क ६ स्पीड गिअरबॉक्ससह जोडते.

तर या भारतात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या टॉप पाच स्पोर्ट्स बाइक्स आहेत.