टोयोटा ही भारतातील लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स लाँच करीत असते. आता कंपनीने एक नवीन योजना आखली आहे. टोयोटा कंपनीने आज जाहीर केले की, २०२६ पर्यंत युरोपमधील बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या सहा मॉडेल्सपर्यंत वाढवणार आहे. तसेच या नवीन कार २० टक्क्यांपर्यंत विकल्या जातील, अशी कंपनीची अपेक्षा आहे.

जगातील सगळ्यात मोठी वाहन कंपनी टोयोटोचे असे म्हणणे आहे की, २०२६ मध्ये युरोपमध्ये येत्या वर्षात २,५०,००० पेक्षा बॅटरीवर चालणारी वाहने विकली जाण्याची शक्यता आहे.टोयोटा बॅटरी ईव्ही कंपनी सध्या युरोपमध्ये गाड्या विकत आहे. एक कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल एसयूव्ही (SUV) संकल्पनेला गेल्या वर्षी कंपनीने आधीच लाँच केले होते.

हेही वाचा…लवकरच रेनॉल्टची इलेक्ट्रिक कार होणार लाँच! डिझाइनपासून ते फिचरपर्यंत ‘या’ गोष्टी असणार खास…

तर, आता टोयोटाने दोन नवी मॉडेल्ससाठी काही संकल्पनांचे अनावरण केले आहे; जे या वर्षाच्या शेवटी युरोपमध्ये विकण्याची कंपनीची योजना आहे. एक म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या अनेक छोट्या एसयूव्ही; ज्या २०२४ मध्ये युरोपमध्ये लाँच करण्यात येतील आणि दुसरी स्पोर्ट्स क्रॉसओव्हर मॉडेलची संकल्पना; जी २०२५ मध्ये लाँच करता येईल, असे टोयोटा कंपनीने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टोयोटा कंपनी २०२६ पर्यंत जागतिक स्तरावर प्रतिवर्षी १.५ दशलक्ष बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीचे लक्ष्य ठेवून आहे. युरोपियन युनियन (EU) मध्ये पूर्णतः इलेक्ट्रिक कारची विक्री वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांच्या तुलनेत निम्म्याहून अधिक वाढली आहे, असा अहवाल युरोपियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या डेटाने गेल्या महिन्यात सादर केला आहे.