Best 7 Seater Car: महिंद्रा स्कॉर्पिओ आणि टोयोटा फॉर्च्युनर ही भारतीय बाजारपेठेत SUV कारची दोन सर्वाधिक लोकप्रिय नावे आहेत. मात्र, काही वेळापूर्वी भारतात दाखल झालेल्या एका सात सीटर कारने या दोन कारसाठी अडचणी निर्माण केल्या आहेत. या सात सीटर कारचा लुक तुम्हाला टोयोटा फॉर्च्युनरची आठवण करून देईल. तर फीचर्सच्या बाबतीतही हे सेगमेंटमधील कोणत्याही वाहनापेक्षा कमी नाही. चला तर पाहूया कोणती आहे ही कार…

‘या’ कारने वाढवलं महिंद्रा स्कॉर्पिओ आणि टोयोटा फॉर्च्युनरच्या अडचणी

‘टोयोटा इनोव्हा हायक्रॉस’ असे या कारचे नाव असून, या कारची ग्राहक जोरदार खरेदी करत आहेत. त्याच्या जोरदार विक्रीमुळे कंपनीला टॉप व्हेरियंटचे बुकिंग थांबवावे लागले. मे महिन्यात या ७ सीटर कारच्या विक्रीत १८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात टोयोटा इनोव्हाच्या ७,७७६ युनिट्सची विक्री झाली होती. तर मे २०२३ मध्ये २,७३७ युनिट्सची विक्री झाली.

(हे ही वाचा : तुमच्या सुरक्षिततेसाठी कारमध्ये असणाऱ्या एअरबॅग्सची किंमत किती माहितेय का? आकडा वाचून व्हाल थक्क )

इंजिन आणि किंमत

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस दोन पॉवरट्रेन पर्यायांसह येते. पहिला पर्याय म्हणजे शुद्ध पेट्रोल पॉवरट्रेन जे १७२ Bhp आणि २०५ Nm टॉर्क निर्माण करणारे २.०-लिटर पेट्रोल इंजिन वापरते. दरम्यान, इतर ड्राइव्हट्रेन पर्याय देखील २.०-लिटर पेट्रोल इंजिन वापरतो, परंतु हायब्रिड सेटअपसह येतो आणि जास्तीत जास्त १८४ Bhp आणि १८८ Nm टॉर्क निर्माण करतो. सध्या इनोव्हा हायक्रॉस मॉडेल लाइनअप G, GX, VX, ZX आणि ZXX (O) ट्रिममध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत १८.५५ लाख ते २९.९९ लाख (एक्स-शोरूम) आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैशिष्ट्ये

इनोव्हा हायक्रॉसच्या प्रीमियम वैशिष्ट्यांच्या यादीमध्ये अनेक मनोरंजक वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये १०-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरामिक सनरूफ, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल आणि ९-स्पीकर JBL-सोर्स्ड म्युझिक सिस्टम समाविष्ट आहे. सुरक्षेसाठी, ६ एअरबॅग्ज, TPMS, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर, ३६०-डिग्री कॅमेरा आणि रडार-आधारित ADAS आहेत.