Toyota Kirloskar Motor कंपनी भारतीय बाजारात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. दिग्गज कार निर्माता कंपनी टोयोटा नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन अपडेट्स घेऊन येत असते. कंपनीच्या कारही भारतीय बाजारात खूप पसंत केल्या जातात. आता पुन्हा एकदा कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवं माॅडेल आणण्याच्या तयारीत आहे. पुढल्या महिन्यातच या कंपनीचं नवं माॅडेल भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता. जाणून घेऊया टोयोटा कंपनी बाजारपेठेत कोणतं नवं माॅडेल लाँच करणार आहे.

तुम्ही Toyota Urban Cruiser Taisor ची आतुरतेने वाट पाहत असाल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण त्याच्या अधिकृत पदार्पणाच्या तारखेची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. ही कार भारतातील टोयोटाच्या एसयूव्ही लाइनअपमध्ये नवीनतम जोड असेल. कंपनीने सांगितले की, त्यांच्या लाइनअपमधील सर्वात लहान एसयूव्ही ३ एप्रिल रोजी सादर केली जाईल. ही नवीन कार मारुती सुझुकी फ्रॉन्क्सची रिबॅज केलेली आवृत्ती आहे. ही नवीन SUV टोयोटा आणि मारुती सुझुकी यांच्यातील भागीदारीचा परिणाम आहे, ज्या अंतर्गत अनेक मॉडेल आधीच बाजारात लाँच केले गेले आहेत.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Death nurse, Corona, compensation husband,
करोनाकाळात परिचारिकेचा मृत्यू, पतीला नुकसानभरपाई नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका संवेदनशील, उच्च न्यायालयाचे ताशेरे
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

Urban Cruiser Taisor बद्दल, Baleno-Glanza अपडेट्समध्ये दिसल्याप्रमाणे त्यात काही कॉस्मेटिक बदल दिसून येतील अशी अपेक्षा आहे. कारण, फ्रंटचे बेस डिझाइन बलेनोमधून घेतले आहे. या नवीन SUV ला सुधारित हेडलॅम्प क्लस्टर, नवीन LED डेटाइम रनिंग लॅम्प्स, अलॉय व्हील्स, टेल लॅम्प्स आणि सुधारित रियर बंपर मिळण्याची अपेक्षा आहे.

(हे ही वाचा : बलेनो नव्हे तर देशातील बाजारपेठेत ‘या’ स्वस्त हॅचबॅक कारसाठी शोरूमवर होतेय मोठी गर्दी, ठरली नंबर वन कार )

इंटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास, या नव्या टोयोटाच्या कारमध्ये फ्रॉन्क्स सारखा डॅशबोर्ड देखील आढळू शकतो. सीटमध्ये नवीन अपहोल्स्ट्री देखील दिसू शकते. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, नव्या टोयोटा कारला फ्रॉन्क्ससारखेच इंजिन पर्याय मिळू शकतात. यामध्ये १.२-लिटर पेट्रोल इंजिन आणि संभाव्यतः १.०-लिटर बूस्टरजेट टर्बो-पेट्रोल युनिट समाविष्ट आहे.

Urban Cruiser Taisor कार स्पर्धात्मक विभागात प्रवेश करणार आहे. येथे हे मॉडेल Tata Nexon, Hyundai Venue, Mahindra XUV300 आणि Maruti Suzuki Brezza सारख्या कॉम्पॅक्ट SUV ला जोरदार टक्कर देऊ शकते.