Nitin Gadkari Answers in Rajaya Sabha: देशात अपघाताचे प्रमाण वाढते असताना केंद्रीय मंत्र्यांनी रस्त्यांवरील अपघात कमी करण्याचा मार्ग सुचवला आहे. नितीन गडकरी यांनी राज्यसभेत महामार्गावरील ट्रक आणि वाहनांना संरक्षण देण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी योजना मांडली आहे. राज्यसभेत नितीन गडकरींना विचारण्यात आले की, केंद्र सरकार काश्मीरमध्ये खूप काम करत आहे, मात्र, असे असूनही रस्त्यांवरील अपघात कमी होत नाहीत. राज्यसभेत प्रश्न विचारताना नामनिर्देशित सदस्य अली म्हणाले की, अनेकदा ट्रकचा अपघात इतका भीषण असतो की, रस्त्यांवर क्रॅश बॅरिअर असूनही ट्रक थांबत नाही, ते सरळ दरीत कोसळतात, यावर गडकरींनी दिले उत्तर, जाणून घ्या…
काय म्हणाले नितीन गडकरी?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी नितीन गडकरी स्वतः पुढे आले. ते म्हणाले की, डोंगराळ भागात अपघातांचे प्रमाण जास्त आहे, हे अगदी खरे आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, पूर्वी लोखंडी अडथळे होते ज्यामुळे मोठे अपघात टाळता येत नव्हते, पण आता नवीन तंत्रज्ञान आले आहे. यामध्ये काँक्रीटमध्ये एक गोल प्लास्टिक मशीन बसवण्यात आले आहे, जे कोणत्याही मोठ्या अपघाताचा दाब सहन करू शकते आणि त्यानंतर ट्रकने कितीही जोरात धडक दिली तरी ते खाली पडत नाही. केंद्रीय मंत्री म्हणाले की, उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश या डोंगराळ भागात असे अपघात अनेकदा घडतात.
(हे ही वाचा : सुमो कारला पैलवानाचे नाव कसे पडले? भारतात बनलेली पहिली गाडी कोणती माहितीये का? जाणून घ्या )
इकोफ्रेंडली अडथळ्याचा संदर्भ देत
नितीन गडकरी म्हणाले की, या प्रकारचे तंत्रज्ञान आता काही ठिकाणी वापरण्यात आले असून असे अपघात आणखी कसे कमी करता येतील, यासाठी आमचा प्रयत्न असेल. नितीन गडकरी यांनी बांबू इको फ्रेंडली अडथळ्याचाही उल्लेख केला आणि आजकाल आसाममध्ये पर्यावरणपूरक बांबू अडथळे बनवले जात आहेत, ज्यामुळे आदिवासींना काम मिळेल.