TVS मोटर्सने सणासुदीच्या काळात प्रगत वैशिष्ट्यांसह आपले ज्युपिटर 125 लाँच केले. SmartXonnect ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीने सुसज्ज असलेल्या ही TVS स्कूटर आता आणखी दोन नवीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. नवीन स्कूटरमध्ये अनेक प्रगत कनेक्टेड वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. नवीन मॉडेल लाँच केल्यानंतर, TVS ज्युपिटर 125 आता भारतीय बाजारात तीन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
नवीन स्कूटरमध्ये ही प्रगत वैशिष्ट्ये
TVS Jupiter 125 च्या SmartXonnect मॉडेलमध्ये ब्लूटूथ-कनेक्टिव्हिटीसह सुसज्ज असलेला TFT डिजिटल क्लस्टर आहे. याशिवाय ब्लूटूथ कनेक्टेड SmartXtalk आणि SmartXtrack सारखी प्रगत वैशिष्ट्ये देखील यामध्ये उपलब्ध आहेत. स्कूटरची ही सर्व प्रगत कनेक्टेड वैशिष्ट्ये ड्रायव्हरला प्रवासादरम्यान अपडेट ठेवण्यास मदत करतात. यामध्ये आधीपासून असलेली इंटिग्रेटेड मोबाईल चार्जिंगची सुविधा अधिक चांगली बनवते.
(हे ही वाचा : मारुतीचा नाद करायचा नाय! देशात नव्या अवतारात आणतेय ‘या’ चार कार, मायलेज ४० किमी अन् किमतही कमी )
ही स्कूटर स्मार्ट फीचर्सने सुसज्ज आहे, स्कूटर चालक त्यांच्या Android आणि iPhone वर TVS Connect मोबाईल अॅपद्वारे आपला स्मार्टफोनही कनेक्ट करु शकतो.
स्कूटरची किंमत
TVS Jupiter 125 च्या नवीन मॉडेलची दिल्लीत किंमत ९६,८५५ रुपये (एक्स-शोरूम) आहे.
