दुचाकी विभागात चांगल्या मायलेज देणार्‍या बाइक्स आहेत. या दुचाकींची किंमत ५२ हजारांपासून रुपयांपासून सुरू होते आणि ८५ हजार रुपयांपर्यंत जाते. जर तुम्हाला स्टाईलसह लांब मायलेज देणारी बाइक खरेदी करायची असेल, तर येथे तुम्ही दोन लोकप्रिय बाइक्सची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. या तुलनेत, आमच्याकडे TVS Radeon आणि Hero Passion Pro आहेत. या दोन्ही बाइकची किंमत ते फीचर्सपर्यंत संपूर्ण तपशील आहेत. जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी योग्य पर्याय निवडू शकाल.

TVS Radeon: टीव्हीएस रेडियन कंपनीची सर्वाधिक विकल्या जाणार्‍या बाइक्सच्या यादीत येते, कंपनीने त्याचे पाच प्रकार बाजारात लाँच केले आहेत. टीव्हीएस रेडियनमध्ये कंपनीने एक सिंगल सिलेंडर १०९.७ सीसी इंजिन दिले आहे. जे एअर-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे, हे इंजिन ८.१९ पीएसची पॉवर आणि ८.७ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ४-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने समोरच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिला आहे. यामध्ये अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर आहेत. मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की, टीव्हीएस रेडियन ७३.६८ किमीचा मायलेज देते आणि हा मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. टीव्हीएस रेडियनची सुरुवातीची किंमत ५९,९२५ रुपये असून टॉप व्हेरियंटवर जाताना ७३,००७ रुपयांपर्यंत जाते.

400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव
best recovered rs 40 lakhs as fine from ticketless travelers
मुंबई: बेस्ट बसमधील ६४ हजार फुकट्या प्रवाशांची धरपकड; ४० लाख रुपये दंड वसूल
Padma Shri awardee, Chami Murmu, tree plantation, environmental protection, Saraikela Kharsawan district of Jharkhand
पर्यावरणरक्षणार्थ झाडं लावणाऱ्या चामी मुर्मू

DigiLocker App वर ड्रायव्हिंग लायसन्स अपलोड करा आणि वाहतूक दंडापासून मुक्त व्हा, जाणून घ्या प्रक्रिया

Hero Passion Pro: हिरो पॅशन प्रो ही एक स्टायलिश मायलेज बाइक आहे. Hero MotoCorp ने चार प्रकारांसह बाजारात आणली आहे. बाईकमध्ये कंपनीने ११३ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन जास्तीत जास्त ९.१५ पीएसची पॉवर आणि ८.८९ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने त्याच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिला आहे. तसेच ट्यूबलेस टायर आणि अलॉय व्हील लावले आहेत. मायलेजबद्दल Hero MotoCorp दावा करते की, पॅशन प्रो ७० किमीचा मायलेज देते आणि ARAI द्वारे प्रमाणित आहे. हिरो पॅशन प्रोची सुरुवातीची किंमत ७०,८२० रुपये असून टॉप व्हेरियंटमध्ये ७५,६२० रुपयांपर्यंत जाते. . आहे.