Upcoming CNG cars in India in 2023: भारतीय वाहन बाजारात सीएनजी कारची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोक सीएनजी वाहनांना पसंती दर्शवत आहेत. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणात सीएनजी कार लाँच करू लागल्या आहेत. जर तुम्ही पुढच्या वर्षी नवीन सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढच्या वर्षी अनेक वाहने भारतीय बाजारपेठेत आपली CNG कार लॉन्च करण्यासाठी सज्ज आहेत. चला तर मग जाणून घेऊया पुढल्या वर्षी कोणत्या CNG कार होणार लाँच…

पुढल्या वर्षी लाँच होणार ‘या’ CNG कार

  • Maruti Breeza CNG

कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी मारुती ब्रेझा कार सीएनजी अवतारात लाँच केली जाणार आहे. सीएनजी किटसह येणारी ही कंपनीची पहिली कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. पेट्रोल आणि सीएनजी ब्रेझा कारमध्ये सारखेच फीचर्स पाहायला मिळतील. पेट्रोल ब्रेझाप्रमाणे सीएनजी ब्रेझा कारमध्ये देखील ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय मिळेल.

If Unhappy Take Leave This Company Big Decision
“आनंदी नसाल तर कामावर येऊ नका”, ‘या’ कंपनीचा मोठा निर्णय; वर्षाला मिळणार ‘इतक्या’ दुःखी सुट्ट्या
New Tax System, New Tax System Criteria, tax deduction, tax pay, Home Loan tax deduction, Tax Regime, New Tax System, finance article, tax article, marathi finance articles,
करावे कर समाधान : नवीन करप्रणाली निवडण्याचे निकष
Shani Nakshatra Parivartan
पुढील ६ महिने ‘या’ राशींचे नशीब अचानक पलटणार? ३० वर्षानंतर शनिदेवाने नक्षत्र बदल केल्याने मिळू शकतो चांगला पैसा
man receives rs 7 crore bill after booking uber auto ride worth rs 62 see viral video
६२ रुपयांना बुक केली उबर ऑटो, अन् बिल आलं चक्क ७.५ कोटींचे; ग्राहकाबरोबर नेमक काय घडल? वाचा

(हे ही वाचा : Flashback 2022: २०२२ मध्ये ‘या’ टॉप ५ MPV खरेदीसाठी तुटून पडले भारतीय; पाहा यादी!)

  • TATA Punch CNG

टाटा पंच सीएनजी लवकरच लाँच करणार असल्याची चर्चा रंगली आहे. ही कंपनीची चौथी सीएनजी कार असणार आहे. टाटा पंच सीएनजी २०२३ च्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता आहे.

Tata Altroz CNG

टाटा मोटर्सची अल्ट्रॉझ ही देशातली सर्वात सुरक्षित हॅचबॅक कार आहे. ही कार आता सीएनजी किटसह लाँच होणार आहे. टाटा अल्ट्रॉझ सीएनजी कारमध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजी किट दिलं जाणार आहे. या कारमध्ये १.२ लीटर नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिलं जाणार आहे. हे इंजिन १०० पीएस पॉवर आणि १३० न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं.

(हे ही वाचा : ५ लाखांपेक्षा कमी किमतीत करा खरेदी करा सिंगल चार्जवर २००km रेंज देणारी ‘ही’ इलेक्ट्रिक कार! )

  • Tata Nexon CNG

टाटा मोटर्सची अपकमिंग सीएनजी कार टाटा नेक्सॉन सीएनजीमध्ये १.२ लीटर Revotron टर्बो पेट्रोल इंजिन दिलं जाऊ शकतं. नेक्सॉन सीएनजीमध्ये ६ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन ऑप्शन मिळेल. नेक्सॉन सीएनजी मायलेजच्या बाबतीत जबरदस्त असेल.

  • Hyundai Creta CNG

ह्युंदाई कंपनी आता सीएनजी वाहनं लाँच करण्यावर फोकस करणार आहे. कंपनी आता त्यांची भारतात सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही क्रेटाचं सीएनजी मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार कंपनी पुढच्या वर्षीच्या ऑक्टो एक्सपोमध्ये सादर करू शकते.