फॉक्सवॅगन गेल्या अनेक दिवसांपासुन चर्चेत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या कंपनीने भारतीय ऑटोमोबाईल कंपनी महिंद्राला एमइबी (MEB) प्लॅटफॉर्म साठी लायसेन्स दिले आहे. महिंद्राकडून याचा उल्लेख INGLO असा केला जातो. गेल्या वर्षी फॉक्सवॅगने ज्या पाच नव्या इलेक्ट्रिक कारची घोषणा केली होती, त्या गाड्या याच प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. फोर्डनंतर एमइबीची महिंद्रा कंपनी दुसरी ग्राहक आहे.

दरम्यान आता फॉक्सवॅगनने भारतातील इलेक्ट्रिक गाडयांच्या वाढत्या लोकप्रियतेकडे लक्ष वळवले आहे. सध्या फॉक्सवॅगन महिंद्रा कंपनीला एमइबी घटकांचा पुरवठा करत आहे. पण लवकरच याच प्लॅटफॉर्मवर फॉक्सवॅगन स्वतःची इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : दिवाळीआधी नवीन गाडी घेण्याचा विचार करताय? मारुती सुझुकीच्या ‘या’ गाडयांवर मिळतोय बंपर डिस्काउंट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टेस्टिंगदरम्यान समोर आला आकर्षक लूक

अलीकडेचा मुंबई-पुणे रस्त्यावर फॉक्सवॅगनच्या नव्या इलेक्ट्रिक कारची टेस्टिंग करण्यात आली. यामध्ये ७७ kwh बॅटरी वापरण्यात आली होती. Skoda Enyaq iV 80x he मॉडेल टेस्टिंगदरम्यान दिसुन आले. VW ID.4 GTX मध्ये ७७ kWh बॅटरी देखील वापरली जाण्याची शक्यता आहे. ID.4 मध्ये जीटीएक्समधील उच्च कार्यप्रणाली असेल. ID.4 फोक्सवॅगनच्या उर्वरित आयडी लाइनअप प्रमाणेच असणार आहे. हे फॉक्सवॅगनच्या ID Crozz संकल्पनेवर आधारित आहे, जे २०२० मध्ये ऑटो एक्सपोमध्ये लाँच करण्यात आले होते.

सध्या भारतात इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये महिंद्रा आणि टाटा एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. टाटा कंपनीची नेक्सॉन कार सर्वात लोकप्रिय आहे. ही भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. महिंद्रादेखील एमइबी प्लॅटफॉर्मच्या मदतीने इलेक्ट्रिक गाडयांच्या क्षेत्रात अधिक यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहे. आता लवकरच फॉक्सवॅगनदेखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे.