Volvo EX90 unveil : आलिशान आणि वेगवान कार निर्मिती कंपन्याही आता पारंपरिक इंधन कार ऐवजी ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक वाहन उपलब्ध करत आहेत. बीएमडब्ल्यू, मर्सिडिज कंपनीच्या काही इलेक्ट्रिक कार्स बाजारपेठेत उपलब्ध आहेत. रोल्स रॉयस देखील आपली स्पेक्टर उपलब्ध करणार आहे, तर ऑडीने अलिकडेच आपल्या नवीन ई ट्रोन क्यू ८ मॉडेल्स लाँच केले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत व्होल्वोही मागे नाही. कंपनीने Volvo EX90 ग्राहकांसाठी सादर केली आहे. ही सात सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही असून २०२४ मध्ये ती जागतिक स्तरावर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

इतकी मिळते रेंज

एसयूव्हीमध्ये १११ केडब्ल्यूएच लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी २५० केडब्ल्यू पर्यंतच्या डीसी फास्ट चार्जिंगसाठी सक्षम आहे. यामुळे केवळ १० मिनिटांच्या चार्जमध्येच ही ईव्ही १८० किमीची रेंज देते. ८० टक्के चार्ज होण्यासाठी या वाहनाला केवळ अर्धा तास लागतो. व्होल्वो ईएक्स ९० ६०० पर्यंतची रेंज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

(AUDI Q8 E TRON वरून पडदा दूर; ५८२ किमीची रेंज, व्हिडिओमध्ये पाहा कारचे भन्नाट लूक)

विशेष म्हणजे, कंपनी ईएक्स ९० च्या माध्यमातून बायडायरेक्शनल चार्जिंग पर्याय देखील देत आहे. घरी वीज पुरवठा खंडित झाल्यास विद्युत पुरवठ्यासाठी या एसयूव्हीचा वापर करता येऊ शकते.

इंजिन

इंजिनबाबत बोलायचे झाले तर, एसयूव्हीमध्ये ट्विन इलेक्ट्रिक पावर फोर व्हील पावरट्रेन देण्यात आले आहे, जे ५१७ एचपीची उर्जा आणि ९१० एनएमचा टॉर्क निर्माण करण्यात मदत करते. एसयूव्ही शुन्य ते १०० किमी प्रति तासाचा वेग केवळ ४.९ सेकंदात गाठते, असा दावा कंपनीने केला आहे. व्होल्वो ईएक्स ९० ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात सुरक्षित कार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

एसयूव्हीमध्ये हाय रेझोल्युशन एलआयडीएआर मिळते, जे वाहनापासून पुढे २५० मिटर पर्यंतचे दृश्य दाखवू शकते. ईव्हीमध्ये १६ अतिरिक्त सेन्सर्स देण्यात आले आहेत. एलआयडीएआर सेन्सर छताच्या पुढच्या बाजूला बसवलेला आहे. या सेन्सरपासून लेव्हल थ्री ऑटोनॉमस ड्रायव्हिंग देखील मिळते.

(सिटबेल्ट न लावण्याचा मूर्खपणा भोवला, १२० किमीच्या वेगाने चालवली टाटा नेक्सॉन, पाहा काय झाले)

डिजाईन

डिजाईनबाबत बोलायचे झाल्यास ईएक्स ९० कंपनीच्या इतर कार्सपेक्षा अधिक वेगळी नाही. पुढच्या भागात टी आकारासह एलईडी लाइट्स आणि मागे सी आकारात एलईडी लाइट्स मिळतात. चांगली एरोडायनामिक कामगिरी मिळण्याच्या दृष्टीकोणातून एसयूव्हीची बॉडी आणि व्हिल्स डिजाईन करण्यात आले आहेत.

इंटेरिअर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसयूव्हीमधील फॅब्रिक तयार करण्यासाठी कंपनीने रिसायकल केलेल्या बाटलांचा वापर केला आहे. वाहनाच्या पुढच्या भागात मध्यभागी १४.५ इंचची मोठी स्क्रिन देण्यात आली आहे, जी गुगल मॅप, गुगल असिस्टंट, गुगल प्ले आणि वायरलेस अ‍ॅपल कार प्ले यासारख्या सुविधा देते.