Maruti Cars Waiting Period: तुम्ही जर मारुती सुझुकी कंपनीची कार खरेदी करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला थोडी वाट पाहावी लागू शकते. कारण या कंपनीच्या काही कार्सवर मोठा वेटिंग पीरियड आहे. मारुतीची कोणतीही कार बूक करण्यापूर्वी आधी त्या कारवरील वेटिंग पीरियड तुम्ही जाणून घेतला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला मारुतीच्या सर्व कार्सवरील वेटिंग पीरियडची माहिती देत आहोत.

मारुती सुझुकी त्यांच्या प्रीमियम डीलरशिप Nexa वरून एकूण आठ कार विकते, त्यापैकी ४ नवीन लाँच केलेल्या कार आहेत आणि त्या खूप लोकप्रिय आहेत. कंपनीच्या Invicto, Fronx, Grand Vitara आणि Jimny या गाड्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. Invicto लाँच होण्यापूर्वीच ६,२०० बुकिंग मिळाले होते. याशिवाय कंपनीकडे Fronx, Grand Vitara आणि Jimny साठीही मोठ्या प्रमाणात बुकिंग आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या डिलिव्हरीची वाट पाहावी लागणार हे निश्चित आहे. चला तर मग या गाड्यांचा जुलै २०२३ मध्ये प्रतीक्षा कालावधी काय आहे ते पाहूया…

Invicto, Maruti Suzuki Fronx, Vitara आणि Jimny साठी प्रतीक्षा कालावधी

मारुती सुझुकी इनव्हिक्टोच्या डिलिव्हरीसाठी ग्राहकांना ४० आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. तर, Fronx SUV च्या डिलिव्हरीसाठी प्रतीक्षा कालावधी १० आठवड्यांपर्यंत आहे. या व्यतिरिक्त, SUV जिमनी या महिन्यात बुक केल्यास, वितरणासाठी २४ आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. ग्रँड विटारा एसयूव्ही देखील खूप लोकप्रिय आहे, ज्यासाठी सध्या २० आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा कालावधी आहे. तथापि, हा प्रतीक्षा कालावधी अंदाजे आहे आणि वास्तविक प्रतीक्षा कालावधी भिन्न असू शकतो.

(हे ही वाचा : TVS अन् Hero ची उडाली झोप, Honda ने देशात दाखल केलंय १२५ सीसी चा नवा स्कूटर, किंमत फक्त…)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Invicto, Maruti Suzuki Fronx, Vitara आणि Jimny किमती

कंपनीतील सर्वात महागडी कार मारुती सुझुकी इनव्हिक्टो आहे, ज्याची किंमत २४.७९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि २८.४२ लाख रुपयांपर्यंत जाते. तर, Fronx SUV ची किंमत ७.४६ लाख रुपयांपासून सुरू होते आणि १३.१३ लाख रुपयांपर्यंत जाते. Grand Vitara ची किंमत १०.७० लाख रुपयांपासून सुरू होते आणि १९.७९ लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. जिमनीची किंमत १२.७४ लाख ते रु. १५.०५ लाख (एक्स-शोरूम) आहे.