Old Car Selling: अनेकजण नवी कार विकत घेण्यापूर्वी आपली जुनी कार विकतात. मात्र जुन्या कारची किंमत अपेक्षेएवढी न मिळाल्याने नुकसानच होते. पण जुनी कार विकताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमची जुन्या कारचीही चांगल्या किंमतीला विक्री होऊ शकते.जर तुम्हाला जुनी कार विकायची असेल आणि त्या जागी नवीन मॉडेलची कार घेण्याचा विचार करत असाल तर आज ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स देणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सहज आणि योग्य किंमतीत कार विकू शकता.

‘या’ पद्धतीने मिळेल जास्त किंमत

  • कार विकण्यापूर्वी कारची सर्व्हिस करून घ्या. जे काही तुमच्या कारमध्ये दोष येत असतील ते दूर करा. इंजिन तेल, एअर फिल्टर आणि इंधन फिल्टर बदला. कारच्या विक्रीआधी सर्विस करणं तुमच्याच फायद्याचं आहे. कारण, कार व्यवस्थित सर्विस केली असेल तर तिचा लूक चांगला राहील आणि खरेदीदाराला कुठेही ‘डील’ खटकणार नाही.
  • कारचं इंटेरिअर चांगलं नसेल तर कार विकत घेणाऱ्या ग्राहकावर चांगला प्रभाव पडत नाही. त्यामुळे कारचं इंटिरिअर चांगलं आणि स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कार आतून ड्राई क्लीन नक्की करा.

(हे ही वाचा : Car Finance Plan: दरमहिना फक्त ८ हजार द्या अन् घरी घेऊन जा जबरदस्त मायलेज देणारी ४ लाखांची कार )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • कार विकण्यापूर्वी त्यावर स्पर्श करून घ्या. स्क्रॅच किंवा डेंट्स असल्यास, त्यांची दुरुस्ती करा. यासोबत रबिंग आणि पॉलिशिंग करून घ्या. यामुळे तुमची कार नवीन दिसेल आणि खरेदीदार अशा कारकडे आकर्षित होतील.
  • कारच्या आतील बाजूकडेही लक्ष द्या. कार ड्राय क्लीन करा. यामुळे योग्य साफसफाईसह कारला फ्रेश फील मिळेल.
  • गाडी विकण्याआधी टायर नक्की तपासा, गाडीचे टायर खराब झाले असतील तर ते बदलून घ्या. तसेच कार विकणार असाल, तर पेंट नक्कीच तपासा, सर्वप्रथम ग्राहक पेंटची स्थिती पाहतो, अशा पेंटकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
  • कार विकताना कारची संपूर्ण कागदपत्र सोबत ठेवा, जेणेकरुन ग्राहकाला डील रद्द करण्याची संधी मिळू शकेल.

या सोप्या टीप्स फॉलो करा आणि तुमच्या जुन्या कारची चांगली किंमत मिळवा.