Old Car Selling: अनेकजण नवी कार विकत घेण्यापूर्वी आपली जुनी कार विकतात. मात्र जुन्या कारची किंमत अपेक्षेएवढी न मिळाल्याने नुकसानच होते. पण जुनी कार विकताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमची जुन्या कारचीही चांगल्या किंमतीला विक्री होऊ शकते.जर तुम्हाला जुनी कार विकायची असेल आणि त्या जागी नवीन मॉडेलची कार घेण्याचा विचार करत असाल तर आज ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स देणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सहज आणि योग्य किंमतीत कार विकू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ पद्धतीने मिळेल जास्त किंमत

  • कार विकण्यापूर्वी कारची सर्व्हिस करून घ्या. जे काही तुमच्या कारमध्ये दोष येत असतील ते दूर करा. इंजिन तेल, एअर फिल्टर आणि इंधन फिल्टर बदला. कारच्या विक्रीआधी सर्विस करणं तुमच्याच फायद्याचं आहे. कारण, कार व्यवस्थित सर्विस केली असेल तर तिचा लूक चांगला राहील आणि खरेदीदाराला कुठेही ‘डील’ खटकणार नाही.
  • कारचं इंटेरिअर चांगलं नसेल तर कार विकत घेणाऱ्या ग्राहकावर चांगला प्रभाव पडत नाही. त्यामुळे कारचं इंटिरिअर चांगलं आणि स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कार आतून ड्राई क्लीन नक्की करा.

(हे ही वाचा : Car Finance Plan: दरमहिना फक्त ८ हजार द्या अन् घरी घेऊन जा जबरदस्त मायलेज देणारी ४ लाखांची कार )

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Want to make huge money by selling your old car follow these tips pdb
First published on: 18-02-2023 at 19:10 IST