What is Fullform of WD-40: आज प्रत्येकाला आपली स्वतःची एक कार असावी असे वाटत असते. अनेकांचे कार खरेदी करण्याचे स्वप्न देखील असते. बाजारात एकापेक्षा एक चांगल्या कार्स उपलब्ध आहेत. देशातील अनेकांकडे चांगल्या दर्जाच्या कार आहेत. पण तुम्ही कधी कारमध्ये असणाऱ्या WD-40 ची बाटलीचे लक्षपूर्वक निरिक्षण केलय का, ही छोटी टिनची बाटली खूप उपयुक्त हे तुम्हाला माहितेय का, या एका बाटलीने बरेच काम केले जाते. तथापि, लोक ते खूप वेळा वापरतात. परंतु, या बाटली संबंधित प्रश्नांची उत्तरे बहुतेकांना माहित नाहीत. चला तर जाणून घेऊया याच प्रश्नांची उत्तरे…

बहुतेक लोकांना ‘हे’ माहित नाही

ज्यांच्याकडे कार आहे त्यांच्यापैकी बहुतेकांकडे WD-40 ची बाटली नक्कीच आहे. ते खूप उपयुक्त आहे. अडीचशे ते तीनशे रुपयांच्या या बाटलीतून सुमारे दोन हजार कामे करता येतात. कारला गंज लागण्यापासून ते दारात आवाज आल्यास ओलावा देण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी लोक याचा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का WD-40 मध्ये WD चे पूर्ण रूप काय आहे आणि त्यात 40 चा अर्थ काय आहे? चला तर जाणून घेऊया…

(हे ही वाचा : Creta चा खेळ संपणार? पाच दिवसांनी देशात येतेय सर्वात सुरक्षित कार, मोठ्या कुटुंबासाठी ठरेल बेस्ट )

हे प्रोडक्ट कधी तयार करण्यात आले?

हे उत्पादन १९५३ मध्ये तयार करण्यात आले होते. नंतर WD-40 चा वापर यूएस ऍटलस क्षेपणास्त्रांना गंजण्यापासून संरक्षण करण्यासाठी केला गेला. WD-40 रसायनशास्त्रज्ञ नॉर्म लार्सन यांनी तयार केला होता. त्यानंतर हळूहळू जगभरात त्याचा पुरवठा होऊ लागला. बरेच लोक हे उत्पादन वर्षानुवर्षे वापरत असतील, परंतु त्यांना त्याचे संपूर्ण उत्तर माहित नसेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

WD-40 चे अर्थ जाणून घ्या

सध्या ते १८० पेक्षा जास्त देशांमध्ये वापरले जाते. अमेरिकन पत्रकार डेव्हिड मुइर यांनी WD-40 चे पूर्ण स्वरूप सांगितले. त्याचे पूर्ण स्वरूप आहे, ‘Water Displacement, 40th formula’ त्याच्या पूर्ण स्वरूपालाही एक अर्थ आहे. प्रत्यक्षात याला बनविण्यासाठी ४० अटेम्प्ट केले गेले. यानंतरच परिपूर्ण उत्पादन तयार झाले. या कारणास्तव त्याच्या नावात ४० जोडले गेले आहे.