Bike Tips: तुम्ही अनेकदा रस्त्यावरून जाताना कुठल्या तरी वाहनातून पांढरा-काळा धूर निघताना पाहिला असेल. मोटरसायकल किंवा स्कूटरमधून जास्त धूर येत असेल, तर ती केवळ एक सामान्य समस्या नाही, तर ते इंजिन खराब होण्याचे आणि मायलेज कमी होण्याचे लक्षणदेखील असू शकते. या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने इंजिनाचे आयुष्यदेखील कमी होऊ शकते. यामागील मुख्य कारणे काय असू शकतात आणि ते कसे टाळता येईल ते जाणून घेऊ….

बाईकमधून धूर निघण्यामागचे कारण

बऱ्याचदा थंडीमध्ये इंजिन गरम झाल्यावर वाफ सोडते. त्यामुळे गाडीच्या मागील बाजूनेही पांढरा धूर निघतो. मात्र, काही काळानंतर तो थांबतो.

इंजिन ऑइलची समस्या

निकृष्ट दर्जाचे इंजिन ऑइल योग्यरीत्या जळत नाही, ज्यामुळे इंजिनामधून निळा किंवा पांढरा धूर निघतो. त्याच वेळी जर इंजिनमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त तेल टाकले, तर ते पूर्णपणे जळू शकत नाही, ज्यामुळे धुराचे प्रमाण वाढते आणि इंजिनावर अतिरिक्त दबाव येतो.

इंधन मिश्रण

जर इंजिनामध्ये इंधन आणि हवेचे मिश्रण योग्य प्रमाणात नसेल, तर इंधन पूर्णपणे जळत नाही, ज्यामुळे जास्त धूर येतो. विशेषतः जर इंधन मिश्रणात वाढ झाल्यास काळा धूर उत्सर्जित होण्याची शक्यता वाढते.

एक्झॉस्ट सिस्टीममध्ये बिघाड झाल्यास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक्झॉस्ट पाइपमध्ये काही अडथळा निर्माण झाला असेल किंवा तो योग्यरीत्या काम करत नसेल, तर इंजिनमधून धुराचे प्रमाण वाढू शकते. त्याशिवाय जर एक्झॉस्ट सिस्टीममध्ये कार्बनचा साठे जमा झाला, तर धुराचे उत्सर्जनदेखील वाढते.

इंजिनामध्ये बिघाड

जर पिस्टन रिंग्ज, व्हॉल्व्ह किंवा सिलेंडरमध्ये समस्या असेल, तर इंधन आणि हवा योग्य प्रमाणात इंजिनापर्यंत पोहोचू शकत नाही, ज्यामुळे इंजिन जास्त धूर सोडते. त्याशिवाय जुने किंवा जीर्ण झालेले इंजिन सील केल्यानेदेखील ही समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे इंजिनाच्या कामगिरीवर परिणाम होतो .