आपण जे पदार्थ खातो त्यांच्या चवीचे वर्णन आपण करू शकतो. समोर अनेक पदार्थ ठेवले असता त्यातून आपल्याला आवडणारे नेमके पदार्थ उचलू शकतो. प्राण्यांना हे वर्णन करून सांगता येत नाही म्हणून प्राण्यांना चव तरी कळते का, असा प्रश्न आपल्याला पडतो.
प्राण्यांना चव कळत असली पाहिजे नाहीतर काही वेळा समोर पडलेल्या पदार्थाला ते तोंड लावत नाहीत. ‘गाढवाला गुळाची चव काय?’ अशी एक म्हण आहे. गाढव जितक्या निर्वकिारपणे कागद खाते, तशाच तऱ्हेने त्या कागदात बांधलेला गूळ खाते, म्हणून ही म्हण पडली असावी. त्याच्या तोंडातील रुचिकलिका फार कमी असाव्यात. माणूस आणि वरच्या वर्गातील प्राण्यांच्या रुचिकलिका त्यांच्या जिभेवर असतात.
वेगवेगळ्या रुचिकलिका वेगवेगळ्या प्रकारची चव आपल्या मेंदूपर्यंत पोचवतात. सगळ्या प्राण्यांना सारख्याच रुचिकलिका नसतात. चवीचवीने खाणाऱ्या माणसाच्या जिभेवर फक्त ३००० रुचिकलिका असतात. पाण्यातला अवाढव्य देवमासा लहान माशांच्या झुंडीच्या झुंडी गिळत असतो. त्याच्या तोंडात रुचिकलिकाच नाहीत. याउलट डुकराच्या जिभेवर माणसापेक्षा जास्त म्हणजे ५५०० रुचिकलिका असतात.
गाय माणसापेक्षा अधिक चोखंदळ म्हटली पाहिजे, कारण तिच्या जिभेवर ३५००० रुचिकलिका असतात. पण तिच्या वाटय़ाला काय येते? तर वाळलेले अथवा ओले गवत.
हरणाला तिच्यापेक्षा जास्त म्हणजे ५००००० रुचिकलिका असतात. पाण्यात वावरणाऱ्या प्राण्यांच्या रुचिकलिका त्यांच्या सर्वागावर असतात. माश्या, फुलपाखरे आपल्या पायांनी चव घेत असतात.    
झोपेची गोष्ट!
माणसाच्या आयुष्यातील २५ वष्रे झोपण्यातच जातात, असे एका अमेरिकन संस्थेने केलेल्या पाहणीत आढळले आहे. नवजात अर्भक २४ तासांपकी १६ तास झोपलेले असते, ही गोष्ट वेगळी. पण काही मोठी माणसंही चांगली दहा-बारा तास झोप काढतात. सर्वसाधारणपणे अमेरिकेतील माणूस साडेसात तास झोपतो, तर कॅनडातील ८ तास २० मिनिटे. अर्थात, तेथे असणाऱ्या थंडीचा हा परिणाम आहे. अनेक भारतीय नऊ तासांहून अधिक वेळ झोपतात. त्याशिवाय तास-दीड तास दुपारची वामकुक्षीही घेणारे अनेक सुखवस्तू आहेत. अमेरिकेतील पाहणीनुसार, तेथील १३ टक्के लोकांची रात्री झोप न लागण्याची आणि भीतिदायक स्वप्नं पडण्याची तक्रार असते. आवश्यक तितकी झोप क्लब स्थापन करण्यात आल्याने या शहराला कुरूप लोकांच्या जगताची राजधानी असे नाव मिळाले आहे.
नकटय़ा नाकाचे, खप्पड गालाचे, हडकुळे, गलेलठ्ठ, रंगाने काळे असे लोक या क्लबचे सदस्य असून
दरवर्षी सप्टेंबर महिन्यात क्लबच्या अध्यक्षांची निवड केली जाते.
शारीरिक सौंदर्यालाच महत्त्व देणाऱ्या समाजात कुरूप लोकांविषयी जागृती घडवण्याचे कार्य या संस्थेचे अध्यक्ष याकोबेली अविरतपणे करीत    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लामार्श : कुरूप लोकांची राजधानी
‘दिसण्या’ला महत्त्व आल्याने सामान्य रूप-रंग घेऊन जन्मलेल्या असंख्य स्त्री-पुरुषांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो.  कुरूप लोकांसाठी जगाच्या पाठीवर एका खास शहराची निर्मिती करण्यात आलेली आहे. इटालीच्या पायोबिको प्रांतातील ‘ला मार्श’ या शहरात कुरूप लोकांचा क्लब स्थापन करण्यात आल्याने या शहराला कुरूप लोकांच्या जगताची राजधानी असे नाव मिळाले आहे.
नकटय़ा नाकाचे, खप्पड गालाचे, हडकुळे, गलेलठ्ठ, रंगाने काळे असे लोक या क्लबचे सदस्य असून
दरवर्षी सप्टेंबर महिन्यात क्लबच्या अध्यक्षांची निवड केली जाते.
शारीरिक सौंदर्यालाच महत्त्व देणाऱ्या समाजात कुरूप लोकांविषयी जागृती घडवण्याचे कार्य या संस्थेचे अध्यक्ष याकोबेली अविरतपणे करीत आहेत. या अनोख्या क्लबचे प्रतीक म्हणून रानडुकराची प्रतिमा वापरली जात असून ‘कुरूपता प्रभावी आहे- सौंदर्य हे दास्य आहे’ हे क्लबचे बोधवाक्य आहे.  या क्लबची सदस्यसंख्या २० हजारांहून अधिक आहे. सौंदर्यवान लोकांना बेगडी आयुष्य जगावे लागते. सुंदर होऊन बेगडी आयुष्य जगण्यापेक्षा कुरूप होऊन खरेखुरे आयुष्य जगणे चांगले- या तत्त्वावर कुरूप लोकांच्या शहराची वाटचाल सुरू आहे.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal kingdom
First published on: 23-11-2014 at 01:14 IST