माकड
डॉ. नीलिमा गुंडी
काल आमच्या अंगणात

वर, खाली, धडाधड
होते उडय़ा मारत
पिल्लांना जवळ घेत
होते कुरवाळत!

मध्येच डोके खाजवी
कसला विचार करी?
वाटले, पाहुणे म्हणून
न्यावे त्यांना घरी!

‘माकड आपला पूर्वज,’
असे म्हणतात बाई!
शेपूट टाकून द्यायची
आपण केली घाई!