साहित्य- रद्दीचे कागद, कात्री, गम, अ‍ॅक्रिलिक रंग, ब्रश, इ.,
कृती- मोठय़ा पेपरचे चार भाग करा व प्रत्येक भागाची एक अशा सहा गुंडाळय़ा तयार करा. त्यांची दोन्ही टोके एकत्र करून पाकळीचा आकार बनवा तो चिकटवा व वाळू द्या. सहा पाकळय़ा एकमेकांना एका आड एक चिकटवून फूल बनवा. एका पूर्ण कागदाची लांब गुंडाळी तयार करा व त्या सर्व पाकळय़ांच्या मध्ये जोडा.
आधी केलेल्या तुकडय़ांपेक्षा छोटे तुकडे करून छोटय़ा गुंडाळय़ा तयार करा व त्याचे गोल बनवा. किमान दोन गुंडाळय़ांचे पाय बनवा. डोळे आणि पाय (फुलांच्या पाकळय़ांसारखे), पंख व एक सरळ गुंडाळी यांच्या मधोमध छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे चिकटवून घ्या. हिरव्या अ‍ॅक्रिलिक रंगाने रंगवा. डोळे व तोंडाच्या भागाला काळय़ा रंगात रंगवा. पूर्णपणे वाळू द्या. असा कागदी चतुर तंगुसाच्या साहाय्याने अडकवल्यास हवेत उडणारा भासेल.

अर्चना जोशी muktakalanubhuti@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arts and crafts for kids
First published on: 12-06-2016 at 01:45 IST