मित्रांनो, आपण आत्तापर्यंत आसपासचा निसर्ग अनुभवला पण ही तर नुसती सुरुवात आहे. आपला भारत हा जगातील समृद्ध जैवविविधता असलेल्या देशांपकी एक आहे. म्हणजेच आपल्याकडे प्राणी, पक्षी, कीटक, जलचर व वनस्पतींचे हजारो-लाखो प्रकार सापडतात. आज त्याबद्दल जाणून घेऊया. उष्ण कटिबंधीय प्रदेशातील मुबलक सूर्यप्रकाश, भरपूर पाऊस व लहान-मोठय़ा असंख्य नद्या भारताच्या बहुतांश भागात असल्यामुळे नसíगक अधिवासांची विविधता खूप आहे.
सह्याद्री (पश्चिम घाट) आणि ईशान्य भारत हे दोन भाग जागतिक जैवविविधता समृद्ध प्रदेश म्हणून ओळखले जातात. सदाहरित व निम-सदाहरित वृक्षांची घनदाट जंगलं इथे पाहायला मिळतात. मध्य भारत, दख्खनचं पठार व उत्तर भारताच्या काही भागात दमट व शुष्क पानझडी जंगलं आढळतात. थोडय़ा कमी पावसाच्या भागात गवताळ कुरणं व झुडपी जंगलं, तर अनेक ठिकाणी समृद्ध पक्षीजीवन असलेले तलाव आहेत. राजस्थान व कच्छमध्ये वाळवंट आहेत तर लडाखमध्ये थंड प्रदेशातील वाळवंट आहे. हिमालय पर्वतांमध्ये उंचीच्या विविध टप्प्यांवर समशीतोष्ण व सूचीपर्णी जंगलं सापडतात, तर अति उंचीवर बराचसा भाग बर्फाच्छादित असतो. हिमालयाच्या पायथ्याशी तराई हा दलदल व जंगलांचा पट्टा आहे. भारताच्या किनारी भागात खारफुटी वनं व खाडय़ांचे अधिवास आहेत. लक्षद्वीप व अंदमान-निकोबारसारख्या बेटांवरील वनस्पती व जलचर सृष्टी समृद्ध आहे.
वाघ, सिंह, बिबटय़ा व हिमबिबटय़ा असे चार मांजर कुळातील मोठे प्राणी आपल्या देशात आहेत. त्याशिवाय हत्ती, एक-िशगी गेंडा, गवा, रानरेडय़ांच्या दोन जाती, याक, मिथुन, हरणांच्या दहा जाती, काळवीट प्रजातीच्या हरणांच्या पाच जाती, रानमेंढय़ांच्या डझनभर जाती, लांडगा, कोल्हा, खोकडच्या तीन जाती, तरस, रानकुत्रा, अस्वलाच्या चार जाती, लाल पांडा, शेकरूच्या सहा जाती आणि उदमांजर, ससा, माकड, वानर, रानडुक्कर, पाणमांजर, वटवाघुळ, मुंगुस, रानउंदीर, खार, चिचुंद्री, डॉल्फिन व डूगाँग अशा प्राण्यांच्या विविध जातींनी भारत समृद्ध आहे. सरपटणाऱ्या व उभयचर प्राण्यांमध्ये मगरींच्या तीन जाती, सापांच्या शेकडो जाती आणि सरडे, पाली, कासव, बेडूक व देवगांडूळ यांच्या असंख्य जाती सापडतात.
पक्ष्यांच्या साधारण १४०० जाती भारतात आहेत. त्यामध्ये धनेश, गरुड, गिधाड, ससाणा, घार, खंडय़ा, कोतवाल, बदक, मोर कुळातील पक्षी, पाणथळीतील पक्षी, माळढोक, मना, घुबड, िभगरी, बुलबुल, पोपट, िशजीर, फुलटोचे, वटवटे, सातभाई यांसारख्या कुळांतील विविध जातींचा समावेश आहे. भारतात १५०० जातींची फुलपाखरं व अन्य किडय़ांच्या हजारो जाती आहेत. वनस्पती विश्वामधील सपुष्प प्रकारातील १५,००० हून अधिक जाती सापडतात. यांमध्ये झाडं, वेली, झुडपांचा समावेश आहे. इतक्या निसर्गसुंदर देशात आपण राहतो याचा आपल्याला अभिमान हवा.
ं३४’२ं३ँी@८ंँ.ूे
संग्रहित लेख, दिनांक 10th Nov 2013 रोजी प्रकाशित
जैवविविधतासमृद्ध भारत
मित्रांनो, आपण आत्तापर्यंत आसपासचा निसर्ग अनुभवला पण ही तर नुसती सुरुवात आहे. आपला भारत हा जगातील समृद्ध जैवविविधता असलेल्या देशांपकी एक आहे. म्हणजेच आपल्याकडे प्राणी, पक्षी, कीटक, जलचर व वनस्पतींचे हजारो-लाखो प्रकार सापडतात. आज त्याबद्दल जाणून घेऊया. उष्ण कटिबंधीय
First published on: 10-11-2013 at 12:04 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biodiversity rich india