साहित्य- जुनी रिकामी झालेली (Harpic Toilet Cleaner) प्लॅस्टिकची बाटली, वर्तमानपत्र, फेविकॉल लगदा, फेविकॉल कलर ब्रश, तार.

कृती- वर्तमानपत्राचा टेनिस बॉलएवढा बोळा करून तो हार्पिकच्या बाटलीवर फेविकॉलच्या साहाय्याने चिकटवून घ्या. वर्तमानपत्राची २ इंच रुंद पट्टी तयार करून घ्या. त्यावर बारीक तार चिकटवून घ्या. तार लावल्यामुळे शेपटीला तुम्हाला हवा तसा आकार देता येईल. तयार झालेली शेपटी बाटलीच्या डाव्या बजूला फेविकॉलच्या साहाय्याने चिकटवून घ्या. कागदाचा लगदा तयार करून तो बाटलीला नीट लावून घ्या. लगद्याच्या साहाय्याने व्यवस्थित तोंड व कानाला आकार द्या. शेपटीलाही व्यवस्थित लगदा लावून घ्या. ती उन्हात वाळवत ठेवा. पूर्णपणे वाळल्यावर मनीमाऊला आकर्षक रंगाने रंगवा.

लगदा तयार करण्याची कृती- कागदाचे बारीक तुकडे करून एका बाऊलमध्ये पाण्यात भिजत ठेवा. लगदा करतेवेळी कागदातले पाणी काढून मिक्सरमधून फिरवून घ्या व त्यात फेविकॉल व व्हायटिनग पावडर घालून छान मळून घ्या.

ketkargauri@gmail.com