हिरवे हिरवे झाड टुमदार
पक्ष्यांचा थवा शानदार
हिरवे झाड आनंदे डोलते
माझ्याशी खेळायला या म्हणते
हिरव्या हिरव्या झाडाची सावली दाट
हिरव्या रंगांना फुलांची साद
हिरव्या झाडावर सुगरणीचा खोपा
खोप्यातल्या पिल्लांना हवेचा झोका
रसाळ फळे, फुले नि पाने
झाड देते हजार हाताने
जीवन मित्र म्हणतात ज्याला
कशाला घालायचा त्यावर घाला?
झाडे फुलवतात जीवन गाणे
तेच ‘आपुले सोयरे’ तुका ही म्हणे!
– पद्माकर भावे