ऐश्वर्य पाटेकर

प्रिय चांदोबा स. न. वि. वि.

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

प्रिय चांदोबा, तुला तुझ्या ‘भाच्या’च्या मुलाचा सप्रेम नमस्कार,

वि. वि. मेल करण्यास कारण की, तुझ्याशी संवाद साधून काही गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत. आकाशाच्या दुनियेत तू नेमका कुठे राहतोस? तुझ्याभोवती उजेडाचं खळं करतोस म्हणजे काय करतो? तुझ्या अवतीभवती असंख्य चांदण्या लुकलुक करतात म्हणे? त्यासाठी केवढं वीजबिल येत असेल? ते कोण पेड करतं? आणि अजूनपर्यंत तू मला का दिसला नाहीस? म्हणजे आणखीही खूप प्रश्न आहेत- आजी-आजोबांसंदर्भातला तर सगळय़ात महत्त्वाचा आहे. त्या साऱ्याच प्रश्नांची खरीखुरी उत्तरं तुला द्यावी लागणार आहेत. त्यासाठीच तर हा मेलप्रपंच..

तुला पहिलाच प्रश्न पडला असेल की, मी तुला चांदोमामा का म्हणालो नाही? बरोबर नं! वाटलंच मला. त्यात माझी काय चूक? अरे, मला जर कुणी सांगितलंच नाही तुझाविषयी, तर कळणार कसं? तुझ्या गोष्टी कोण्या आजी-आजोबांकडे आहेत म्हणे! हे आजी-आजोबा कोणत्या कंट्रीत राहतात? त्यांचा पत्ता तूच मला सांगू शकशील. कारण बाबा तर त्याविषयी काही सांगायलाच तयार नाही, त्यामुळे तुझ्यापर्यंत पोहचण्याचा मार्गच खुंटला. म्हणजे बघ नं! तू माझ्या बाबांचा मामा झालास, कारण त्याच्या आजीने म्हणे तुझ्या गोष्टी अन् गाणी त्यास ऐकवली म्हणून, मग चांदोमामा म्हणण्याचा अधिकार फक्त माझ्या बाबाला, तो मला कुठून? मला कुठली आजी? नाहीच नं म्हणून तर तुला चांदोमामा म्हणण्यापासून वंचित राहिलो. मी तुझा भाचा नाही होऊ शकलो. ही खंत तुलाही वाटते काय रे? माझा जन्म झाला तसं मी तुला पाहिलेलं नाही. तू गोल आहेस की वेटोळा का चौकोनी? मीच पाहून खात्री करून घेऊ म्हणतोस? कसं शक्यय? माझं शेडय़ुल केवढं टाईट असतं; तुला काय सांगायचं? दिवसभर तर शाळाच असते; घरी आलं की टय़ुशन- एक का दोन! माझा आवाज चांगला नाही तरी मला गाण्याची टय़ुशन, नाचण्यात मला रस नाही तरी डान्सची टय़ुशन, वादनाची आवड नाही तरी त्याचीही टय़ुशन.. या टय़ुशनवरून आयडिया सुचलीय, तोच तुझ्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग मला वाटतोय..

हेही वाचा… बालमैफल: रडकं मेपल जेव्हा हसतं..

तू घे की अशीच एखादी टय़ुशन. आई-बाबा तुझ्या टय़ुशनला मला नक्की पाठवतील! बाबांकडे खूप खूप पैसे आहेत. ते मला कुठलीही टय़ुशन लावू शकतात. माझ्या बाबांकडे लहानपणी खूप वेळ असायचा म्हणे, म्हणून तर तुझी अन् त्यांची गट्टी जमली, माझ्याकडे नाहीचय नं वेळ. तूच सांग माझी वेळ कुणी हिरावून घेतली?

‘चांदोबा चांदोबा भागलास का ?

निंबोणीच्या झाडाआड लपलास का ?

निंबोणीचं झाड करवंदी

मामाचा वाडा चिरेबंदी

मामाच्या वाडय़ात येऊन जा

तूप-रोटी खाऊन जा.’

चांदोबा तू नशीबवान आहेस बरका, मामाचा वाडा तू नुसता पाहिला नाहीस तर थेट तिथे राहून आला आहेस. मलाही मामाच्या वाडय़ात जाऊन तो चिरेबंदी वाडा पाहायचा आहे. पण तसं करता येत नाही रे, म्हणजे मला शाळेला सुट्टी मिळत नाही असं नाही. मिळत- पण समर व्हेकेशन. त्याचं काय करायचं? बाबाला एकाच वेळी माझ्यात खूप गोष्टी भरायच्या आहेत. त्यात बाबांची चूक आहे, असं नाही. खूप मोठी स्पर्धा सुरू झालीय. या स्पर्धेत उतरल्याशिवाय काहीच गत्यंतर काळाने ठेवलं नाही. आम्हा पोरांना त्यात पळावंच लागतं. आम्ही दमलो, म्हणायला उसंत नाही.

तुला माहितीय मला मित्रच नाही. कसे होतील मित्र? एकाच अपार्टमेंटमधली माझ्या वयाची मुलं वेगवेगळय़ा शाळेत जाताहेत. दप्तराचं ओझं तू पाहतोयस का माझ्या पाठीवरचं? मला रिक्वेस्ट करायची आहे तुला. तू माझ्या बाबांना सांगशील का दप्तराच्या ओझ्याबरोबर अभ्यासाचं ओझं कमी करायला? तू तसं काही करणार नाही, मला माहिती आहे.

बाबा म्हणतात, पुढे जाऊन तुला खूप मोठं पॅकेज मिळावायचंय. काय काय असतं या पॅकेजमध्ये? हिरवी हिरवी झाडी असतात का? हिरवी शाल पांघरलेला डोंगर तरी? झुळझुळ वाहणारे झरे? आणि नदी? खेळण्यासाठी मोठेच्या मोठी मैदाने? हे काहीच नाही, मग त्याचं माझ्या बाबाला एवढं अप्रूप का? बाबाच्या अपेक्षांचं भलंमोठं ओझं माझ्या पाठीवर आहे. ते फार फार जड झालंय रे ! दप्तराचं ओझं भलेही कमी केलं जाईल; बाबाच्या अपेक्षांचं ओझं कसं कमी करणार? चांदोबा तुही या लोकांच्या कटात सामील झाला की काय?

तुला तूप-रोटी खायला बोलवायचं भाग्य आम्हास नाही. बरं आठवलं! तू इन्स्टा वापरतो का? फेसबुक तरी? नसेल तर खोल तुझं अकाउंट, म्हणजे आपल्याला कनेक्ट राहता येईल. तुझ्याबरोबर मला सेल्फी घ्यायचा आहे. म्हणजे माझं हे स्वप्न आहे ते पूर्ण कधी होईल माहिती नाही. तोपर्यंत मी मोठा झालो तर!

तुझी अन् माझी भेट कधीच नाही का? बाकी तूप-रोटीची डिश मला काय माहिती नाही, तुला पिझ्झा-बर्गर देईन. कॅडबरी देईन. अगदी तू मागशील ते देईन. भलेही तुला टय़ुशन घ्यायची नसेल तर घेऊ नकोस. मात्र तेवढा आजी-आजोबांच्या टय़ुशनचा पत्ता मला धाडून दे! आजी-आजोबाच तुझ्यापर्यंत पोचवतील एवढं कळलं आहे मला. म्हणून तुला कळकळीची विनंती आहे फ्रें ड, पत्ता कळवायला विसरू नकोस.

कळावे,

तुझ्या भाच्याचा चांदोबा न पाहिलेला मुलगा..