कळपाने राहणारा, शाकाहारी तरीही बलवान, बुद्धिमान असलेल्या हत्तीला भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान आहे. भाद्रपद महिन्यात येणारे गणपती हत्तीचे मुख घेऊन येतात, आश्विन महिन्यातील एक नक्षत्र हस्त, हत्तीच्या रूपाने येते. नवरात्रातील भोंडल्यामध्ये हत्तीच्या चित्राभोवती फेर धरून स्त्रिया व मुली गाणी म्हणतात. आजच्या खेळात हत्तीशी संबंधित येणारे वाक्प्रचार/म्हणी, शब्द तुम्हाला एका गटात दिलेले आहेत. त्यांच्याशी संबंधित सूचक माहिती दुसऱ्या गटात दिलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर : १) अंकुश २) माहूत ३) अंबारी ४) ऐरावत ५) करभ ६) चीत्कार ७) झूल ८) पीलखाना

९) दारांत हत्ती झुलणे १०) हत्ती गेला शेपूट उरले ११) पांढरा हत्ती १२) गंडस्थळ

 

सैनिकदादा

सीमेवरच्या सैनिकदादा, तुझी सावली ही मोठी

गोष्ट सांगतो मी सगळ्यांना, किंचितही नाही खोटी.

तुझा पहारा सक्त असे जो, भिववित राही शत्रूला

शौर्याच्या या तुझ्या कहाण्या, स्फूर्ती देती आम्हाला.

रक्षण करिसी सदैव आमुचे, दिवसाही अन् रात्री

तू असताना नको काळजी, मनामनाला ही खात्री.

सीमेवरती लढणाऱ्याला, नसे वार अन् सणवार

दूरच असती सगेसोयरे, तसेच आणिक घरदार.

सैनिकदादा तुला धाडले, निरखून घे रे हे पान

साधे दिसते आपटय़ाचे ते, मोठा असे त्या मान.

पानासोबत धाडत आहे, सलाम मनोमन तुजसाठी

किती वाहसी कष्ट तऱ्हेचे, केवळ रे आमुच्यासाठी.

धास्ती नाही तुला जरी रे, तोफेचे गोळे सुटले

म्हणूनच राही सुरक्षित रे, अंगण आमुचे हे इथले.

जरी लांब तू त्या सीमेवर, जवळची असशी रे आमुच्या

हात जोडूनी प्रणाम करितो, शौर्याला रे तुमच्या.

 राजीव

ज्योत्स्ना सुतवणी – jyotsna.sutavani@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Simple quiz questions and answers for children
First published on: 09-10-2016 at 01:28 IST