01vijay1मेष जी कामे अगदीच ठप्प झाली होती, त्याला गती देण्यासाठी तुम्ही निर्धार कराल. व्यापार-उद्योगातील जी प्रकरणे विनाकारण लांबलेली होती, तेथे बुजुर्गाचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल. नोकरीमध्ये कितीही काम केले तरी वरिष्ठ खूश होत नाहीत असे पाहून तुम्हीच हात आखडता घ्याल. घरामध्ये स्वत:चे मन:स्वास्थ आणि मोठय़ा व्यक्तींची प्रकृती या दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल. तरीही तुम्ही उसने अवसान आणून काम कराल.

वृषभ दीर्घ काळानंतर तुमचे ग्रहमान तात्पुरते सुधारणार आहे. त्याचा फायदा उठविण्याकरिता तुम्हाला पुढे येणाऱ्या संधीचा विचार करून ठेवावा लागेल. व्यापार-उद्योगात महत्त्वाच्या किंवा मोठय़ा व्यक्तींशी गाठीभेटी होतील. त्यांच्याकडून काम करवून घेण्यासाठी त्यांचे तंत्र सांभाळणे आवश्यक आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या वरिष्ठांशी वाद-विवाद टाळा. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचे मूड सांभाळणे थोडेसे कठीण असेल. त्यांच्या कलाने वागणे भाग पडेल.

मिथुन सर्व ग्रहस्थिती म्हणजे ‘मानलं तर समाधान’ अशी आहे. तुम्हाला काय आवडते आणि काय आवडत नाही असा पर्याय तुमच्यापुढे नसेल. व्यापार-उद्योगात प्राप्तीचे प्रमाण साधारण राहील. अनपेक्षित खर्चाकरिता हातात पसे राखून ठेवा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी आयत्या वेळी त्यांचे कार्यक्रम बदलल्याने तुमची दगदग/धावपळ वाढेल. घरामध्ये तुमचा सल्ला योग्य असूनही इतरांना तो न पटल्यामुळे तुम्हाला त्यांचा राग येईल. पण नंतर त्याचे महत्त्व त्यांना पटेल.

कर्क परिस्थिती कशीही असो त्यापुढे हार न मानता काम करत राहायचे हा तुमचा स्वभाव आहे. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात सर्व विचार नीट केल्याशिवाय घाईने निर्णय घेऊ नका. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना एखादी ऑर्डर मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्हाला विशेष सवलत देतील. तुमच्याकडून नेहमीपेक्षा जास्त काम करून घेतील. घरामध्ये जोडीदाराचे प्रश्न तुम्ही समजून घ्याल. त्यावर एखादा चांगला तोडगा शोधून काढाल. स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष द्या.

सिंह गेल्या काही महिन्यांमध्ये तुमच्या धावपळीमुळे ज्या विरोधकांनी तुमच्याविरुद्ध कुरघोडी केली होती त्याचा समाचार घ्यायचे तुम्ही ठरवाल. व्यापार-उद्योगात ज्या गोष्टीत तुम्ही लक्ष घालाल ती गोष्ट मनाप्रमाणे वेग घेईल. मात्र इतरांवर अवलंबून राहिलात तर थोडीशी फजिती होईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही मान मोडून काम कराल. पण ते काम वरिष्ठांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे की नाही याचा अंदाज घ्या.  घरामध्ये मोठी जबाबदारी तुमच्यावर येऊन पडण्याची शक्यता आहे.

कन्या ग्रहमान तुमच्यामध्ये एक प्रकारची वेगळी जिद्द निर्माण करणारे आहे. इतर वेळेला कोणताही निर्णय घ्यायला तुम्ही खूप वेळ लावता, पण या आठवडय़ात आधी कृती आणि नंतर विचार असा तुमचा प्रकार असेल. व्यापार-उद्योगात पशाविषयी खूप चिकित्सा न करता जी गोष्ट तुमच्या मनाला पटलेली आहे, ती करून टाकण्यावर भर असेल. नोकरीच्या ठिकाणी योग्य व्यक्तीची योग्य वेळेला साथ मिळेल. घरामधल्या प्रत्येक निर्णयात तुमचा पुढाकार असेल.

तूळ ग्रहमान तुम्हाला कोडय़ात टाकणारे आहे. मनाच्या कोपऱ्यात थोडासा आराम करावा ही भावना असेल. व्यापार-उद्योगात प्रत्येक काम मार्गी लावण्यासाठी तुम्हाला स्वत: पुढाकार घेणे आवश्यक ठरेल. आíथक गोष्टींना प्राधान्य द्याल. नोकरीमधल्या कामानिमित्त आठवडय़ाच्या सुरुवातीला छोटा प्रवास घडण्याची शक्यता आहे.  घरामध्ये एखादा लांबलेला कार्यक्रम निश्चित केला जाईल. त्यातील खर्चात काटछाट करणे भाग पडेल.

वृश्चिक जे आपल्यापाशी नाही त्याचा तुम्ही फायदा उठवता. या तुमच्या गुणांचा सर्व पातळीवर उपयोग होईल. व्यापार-उद्योगात जे काम चालू आहे त्याला फारशी गती नसल्यामुळे ‘धक्का स्टार्ट’ या पद्धतीचा अवलंब कराल. आíथक बाजू सुधारण्याची लक्षणे दिसतील. नोकरीच्या ठिकाणी कोणाकरिताही अडून न राहता ज्या पद्धतीने तुम्हाला काम करणे शक्य आहे ती पद्धत अवलंबाल. एखाद्या कामानिमित्त छोटा प्रवास घडेल. घरामध्ये तुमचे विचार पटवून देण्यात तुम्ही सफल व्हाल.

धनू ग्रहमान तुम्हाला आनंदी आणि उत्साही ठेवणार आहे. केलेल्या प्रत्येक कामातून आपल्याला काही तरी मिळाले पाहिजे असा एकंदरीत तुमचा आग्रह असेल. व्यापार-उद्योगात जास्त फायदा मिळवून देणारे एखादे काम तुमच्या नजरेच्या टप्प्यात येईल. त्याचा तुम्ही ताबडतोब पाठपुरावा कराल. नोकरीमध्ये एखाद्या वेगळ्या सवलतीकरिता तुमची निवड होण्याची शक्यता आहे. घरामध्ये तुम्ही तुमचा शब्द खाली पडू देणार नाही.

मकर हातामध्ये पसे असले की तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो काही तरी वेगळाच असतो. तसा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. व्यापार-उद्योगात जे काम चालू आहे ते समाधानकारक असेल, पण तुम्हाला मात्र त्यामध्ये फेरफार करून धनप्राप्ती वाढवाविशी वाटेल. नवीन नोकरीच्या प्रयत्नांत यश मिळेल. घरामध्ये समारंभाच्या निमित्ताने आपुलकीच्या व्यक्तींशी गाठभेट होईल. त्यांना भेटल्यावर तुम्हाला बरे वाटेल.

कुंभ खट्टा-मिठा अनुभव देणारे हे ग्रहमान आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला पाहिजे असा तुमचा आग्रह असेल.  व्यापार-उद्योगात पशाचा ओघ चांगला राहील. जे पसे हातात पडतील त्यातून पूर्वीची काही कर्जे फेडता येतील. नोकरीच्या ठिकाणी मी म्हणेल ती पूर्व दिशा असा दृष्टिकोन ठेवू नका, म्हणजे केलेल्या कामाचा आनंद मिळेल. घरामध्ये तुमचे काम शिस्तबद्ध असेल. त्याचा तुमच्यापेक्षा इतरांना जास्त फायदा होईल.

मीन ग्रहमान तुमच्या आनंदी राहण्याच्या स्वभावाला खतपाणी घालणारे आहे. ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणचे वातावरण चतन्यमय बनवाल. व्यापार-उद्योगात जी संधी पुढे आहे त्याचा फायदा उठवा. पूर्वी केलेल्या कामाचे पसे हातात पडल्यामुळे तुमचा खिसा गरम राहील. नोकरीमध्ये केलेल्या चांगल्या कामाची वरिष्ठ दखल घेतील. घरामध्ये एखाद्या निमित्ताने दीर्घ काळानंतर लांबच्या व्यक्तीला भेटण्याचा योग येईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com