14 December 2017

News Flash

भविष्य : दि. २६ मे ते १ जून २०१७

चांगले आणि वाईट यांचा समसमान वाटा तुम्हाला लाभणार आहे.

विजय केळकर | Updated: May 26, 2017 1:01 AM

राशिचक्र

01vijay1मेष  चांगले आणि वाईट यांचा समसमान वाटा तुम्हाला लाभणार आहे. चार पसे हाताशी खुळखुळल्याने आनंदी मूडमध्ये असाल. व्यापार-उद्योगातील कामकाज गती घेईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही जास्त काम करावे म्हणून वरिष्ठ एखादे अमिष दाखवतील. पण काम जिकिरीचे असेल. बेकार व्यक्तींना नवीन काम मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. घरातील वादात प्रतिष्ठा पणाला लावू नका. कौटुंबिक खर्च वाढतील.

वृषभ  ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ या वाक्याची आठवण येईल. ध्येय पूर्ण करण्याकरता काहीही करण्याची तयारी असेल. व्यापार-उद्योगात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीने तुम्हाला आश्वासन दिल्यामुळे किंवा सक्रिय मदत केल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. नोकरीमध्ये हातात घेतलेले काम पूर्ण होईपर्यत त्याच्याविषयी वाच्यता करू नका. वरिष्ठांना अतिउत्साहाच्या भरात शब्द दिलात तर तो महागात पडेल. घरामधल्या मोठय़ा व्यक्तींचे तंत्र सांभाळावे लागेल. एखादा खर्चीक सोहळा पार पडेल.

मिथुन  जी गोष्ट तुम्हाला लांबून सहज, सोपी वाटली होती ती करायला गेल्यावर त्यातील अडथळे कळतील. व्यापार-उद्योगात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून साथ मिळाल्यामुळे बरे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खूश ठेवण्यासाठी बरेच काम करावे लागेल. वेळप्रसंगी या टेबलावरून त्या टेबलावर अशी तुमची स्थिती होईल. घरामध्ये छोटय़ा-मोठय़ा कारणावरून जोडीदाराशी कुरबुरी होतील. मोठय़ा व्यक्तीच्या मध्यस्थीमुळे त्यावर तोडगा निघेल. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील.

कर्क  ग्रहमान तुम्हाला चकवा देणारे आहे. ज्या कामाविषयी तुम्हाला खात्री होती, त्यामध्ये गुंतागुंत होईल. याउलट अवघड कामात लवकर सफलता मिळेल. व्यापार-उद्योगात अनपेक्षित खर्च उद्भवल्याने हातात पसे शिल्लक राहणार नाहीत. नोकरीमध्ये एखाद्या विशेष सवलतीच्या बदल्यात अवघड काम वरिष्ठ विश्वासाने तुमच्यावर सोपवतील. पण तुमची दगदग, धावपळ प्रमाणाबाहेर वाढेल. घरामध्ये जो माणूस काम करतो त्याच्याच मागे काम लागते असा अनुभव येईल.

सिंह  ग्रहमान तुमची अभिलाषा वाढविणारे आहे. व्यापार-उद्योगामध्ये पशाचा ओघ व्यवस्थित चालू असेल. खूप पसे मिळविण्याच्या इच्छेने सबसे बडा रुपय्या या तत्त्वानुसार तुम्ही काम करतच रहाल. मात्र त्यासाठी जास्त धोका पत्करू नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी पूर्वी एखादे आश्वासन दिले असेल तर ते पूर्ण करतील. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींकडून तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक ऐकायला मिळेल.

कन्या  ग्रहस्थिती तुम्हाला थोडीशी मूडी आणि आग्रही बनविणारी आहे. जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे ती मिळाल्याशिवाय तुम्हाला चन पडणार नाही. व्यापार-उद्योगात कामाचा वेग वाढविण्याकरिता  आधुनिकीकरण करावेसे वाटेल. कारखानदार त्या निमित्ताने परदेश दौरा करतील. नोकरदार व्यक्ती स्वत:ची एखादी पूर्वीची मागणी पूर्ण करण्याकरिता वरिष्ठांशी युक्तीने वागतील. बेकार व्यक्तींना रोजंदारी मिळेल. घरामध्ये एखादा जुना प्रश्न अचानक डोके वर काढेल. त्यापासून थोडेफार गरसमज होतील.

तूळ  समुद्रामध्ये जशा लाटा खाली-वर होत असतात त्याप्रमाणे या आठवडय़ात तुमचे मन हेलकावे खात राहील. व्यापार-उद्योगात तुमचे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याविषयी घोषणा करू नका. अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याचा तुम्हाला उपयोग होईल. नोकरीमध्ये कोण काय बोलते यावर लक्ष ठेवा. महत्त्वाची कामे शक्यतो स्वत:च हाताळा. घरामध्ये जोडीदाराशी क्षुल्लक कारणावरून वादविवाद होतील. त्याचा जास्त विचार करू नका. हवापालटामुळे मनोवृत्तीत सकारात्मक बदल होईल.

वृश्चिक  जीवन म्हणजे आशा-निराशेचा लपंडाव असतो. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हे प्रत्येकाने ठरवायचे असते. व्यापार-उद्योगात  तुमची बरीचशी भिस्त हाताखालच्या व्यक्तींवर असल्यामुळे त्यांना खूश ठेवा. हातातील पसे काटकसरीने वापरा. नोकरीमध्ये साध्या आणि सरळ वाटलेल्या कामात अचानक वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही गाफील राहू नका. घरामध्ये नातेवाईक आणि मित्रमंडळींशी जपून बोला.

धनू  काही कामे अशी असतात, जेथे आपला नेहमीचा वेग किंवा नेहमीची पद्धत उपयोगी पडत नाही. त्यासाठी असामान्य निश्चय आणि मेहनतीची गरज असते. या आठवडय़ात असेच एखादे काम तुम्ही पार पाडाल. व्यापार-उद्योगात ज्या कामातील यशाविषयी खात्री नव्हती त्यात मुसंडी माराल. नोकरीमध्ये ज्यांनी तुम्हाला कमी लेखले होते त्यांना धडा शिकवाल. मात्र अतिश्रमामुळे मध्येच प्रकृतीला त्रास संभवतो.

मकर  कोणताही निर्णय घेताना तुम्ही खूप वेळ लावता, पण या आठवडय़ामध्ये घरातील व्यक्तींनी आग्रह केल्यामुळे तुम्हाला त्यांच्या मतानुसार वागणे भाग पडेल. व्यापार-उद्योगात योग्य व्यक्तींची योग्य कामाकरिता निवड करा. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला कामाचा आळस येईल. काम करण्यापेक्षा काम टाळण्याकडे तुमचा कल राहील. घरामध्ये नातेवाईकांचा मेळावा ठरेल. पूर्वी ठरलेले एखादे कार्य पार पडेल. कार्यक्रमाच्या निमित्ताने नातेवाईक आणि इतर सदस्यांची उलटसुलट चर्चा होईल. मात्र कोणालाही टाकून बोलू नका.

कुंभ  एकटय़ाने काम करणारी तुमची रास आहे. त्यामध्ये इतरांनी ढवळाढवळ केलेली तुम्हाला चालत नाही. पण या आठवडय़ामध्ये करियर आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर तुम्हाला इतरांशी जुळवून घ्यावे लागेल. व्यापार-उद्योगात भरपूर काम करून भरपूर पसे मिळवावेसे वाटतील. मात्र त्यासाठी अयोग्य व्यक्तींशी संगत धरू नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्ही केलेल्या कामाची स्तुती करतील. तुमच्या सहकाऱ्यांना तुमची असूया वाटेल. घरामध्ये आवडत्या भावंडांशी गाठभेट होईल.

मीन  प्रत्येक व्यक्तींमध्ये विघातक आणि सत्यप्रवृत्ती असते. या आठवडय़ात हे दिसून येईल. गरजू व्यक्तीला तुम्ही मदत करायला मागे-पुढे पाहणार नाही. ज्या व्यक्ती विनाकारण तुमचा अपमान करतील त्यांना तुम्ही चार शब्द सुनविल्याशिवाय राहणार नाही. व्यापार-उद्योगात जरी थोडे कमी पसे मिळाले तरी चांगले नाव कमवाल. नोकरीच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने काम सांगून वरिष्ठ तुमची परीक्षा पाहतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on May 26, 2017 1:01 am

Web Title: astrology 26th may to 1st june 2017