मेष या आठवडय़ात तुमच्या ठरविलेल्या कामात तुम्ही चांगली मजल मारू शकाल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात नवीन वर्षांकरिता मनाशी आखून ठेवलेले बेत जर मागे-पुढे झालेले असतील तर त्यात आता तुम्ही थोडीफार प्रगती करू शकाल.  नोकरीच्या ठिकाणी अवघड काम सांगून वरिष्ठ तुमची परीक्षाच बघतील, पण त्यातून तुम्ही पार पडाल. घरामध्ये एखादी गोष्ट इतरांना समजावून सांगाल, पण त्यांना ती पटली नाही तर ते काम तुम्ही पूर्ण कराल.

वृषभ ज्या कामात काही तांत्रिक अडथळे निर्माण झाले होते ते काम मार्गी लागण्याची शक्यता दिसू लागेल. तुमचा उत्साह बळावेल. व्यवसाय-उद्योगात मेहनत घ्यायची तुमची नेहमीच तयारी असते. त्याला आता नशिबाची साथ मिळाल्यामुळे यशाचे प्रमाण हळूहळू वाढेल. पूर्वी केलेल्या कामाचा आणि सदिच्छेचा तुम्हाला उपयोग होईल. नोकरीमध्ये एखाद्या कठीण कामातून मुक्तता झाल्यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकाल. खास कामागिरीकरिता वरिष्ठ तुमची निवड करण्याची शक्यता आहे.

मिथुन तुमची परिस्थिती तोंड झाकलं तर पाय उघडे पडतात आणि पाय झाकले तर तोंड उघडे पडते अशी होणार आहे. एखादे काम आपल्या मनाप्रमाणे होत नाही, असे वाटून त्यात तुम्ही पुढाकार घ्याल. त्यामुळे प्रगती होईल. पण दुसऱ्या एखाद्या कामात त्रुटी सहन कराव्या लागतील. व्यवसाय-उद्योगात सर्व कामे एकटय़ाने न करता केवळ आíथक व्यवहारांवर लक्ष केंद्रित करा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्हाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करतील.

कर्क  आठवडय़ात या दोन्ही आघाडय़ांवर तुम्हाला सुवर्णमध्य काढायचा आहे. व्यापार-उद्योगात नवीन काम मिळविण्याकरिता तुम्ही जर प्रयत्न केले असतील तर आता त्याला थोडाफार प्रतिसाद मिळू लागेल, मात्र दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नोकरीच्या ठिकाणी नेहमीच्या कामाबरोबर एखादी वेगळी जबाबदारी वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये तुम्ही फारसे लक्ष देऊ शकणार नाही. त्यावरून इतरांची नाराजी सहन करावी लागेल.

सिंह नाही हा शब्द तुम्हाला आवडत नाही, या तुमच्या स्वभावानुसार प्रत्येक कामात तुम्ही पुढाकार घेत राहाल. व्यापार-उद्योगात सध्या जे काम चालू आहे त्याव्यतिरिक्त काहीतरी वेगळे आणि छान काम करावेसे वाटेल. नोकरीमध्ये आपले महत्त्व वाढविण्याकरिता वरिष्ठांच्या पुढे पुढे करावे लागेल. त्याच्या परिणामांचा आधीच अंदाज घ्या. घरामध्ये तुमचे विचार बरोबर असूनही इतरांना ते न पटल्यामुळे तुमच्यामध्ये मानापमानाची भावना निर्माण होईल.

कन्या मच्या इच्छा-आकांक्षा वाढायला सुरुवात होतील. मात्र शारीरिक क्षमतेचा अंदाज घेतल्याशिवाय कोणतीही जबाबदारी स्वीकारू नका. व्यवसाय-उद्योगात तुमचे काही अंदाज-आडाखे बरोबर ठरल्यामुळे तुम्ही उत्साही बनाल. नोकरीच्या ठिकाणी जादा काम करून स्वत:च्या जिवाची कुतरओढ करू नका. घरामध्ये अडचणीच्या वेळेला तुम्ही दिलेला सल्ला, अंदाज याचा एखाद्या सदस्याला चांगला उपयोग होईल. महत्त्वाची बातमी कळल्यामुळे सर्वजण खूश असतील.

तूळ या आठवडय़ात काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत असल्यामुळे तुमच्यामध्ये उत्साहाचे वारे सळसळेल. सभोवतालच्या व्यक्तींनाही त्यात सामील करून घ्याल. व्यापार-उद्योगात जेवढे जास्त काम तेवढी जास्त कमाई असे एकंदरीत वातावरण असेल. नोकरीमध्ये कोणाच्याही मतांची पर्वा न करता तुम्ही तुमच्या पद्धतीने काम कराल. बेकार व्यक्तींना काम मिळण्याची शक्यता असेल. घरामध्ये तुमचे विचार इतरांना पटवून द्याल.

वृश्चिक वतालचे वातावरण झपाटय़ाने बदलत आहे असे तुमचे अंतरमन तुम्हाला कौल देईल, पण नेमके त्यातून काय घडणार आहे याविषयी मात्र अनिश्चितता असेल. व्यवसाय-उद्योगात पसे जेमतेम मिळत राहिल्यामुळे जादा फायद्याकरिता किंवा उलाढाल वाढविण्याकरिता काहीतरी वेगळे केले पाहिजे असे वाटेल. मात्र घाईने निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी संस्थेच्या वातावरणातील बदलामुळे आपले काय होणार अशी मनात चिंता असते. कोणावरही जास्त विसंबून राहू नका.

धनू ही ग्रहस्थिती तुमच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणार असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची फक्त चांगली बाजू दिसेल. व्यवसाय-उद्योगात जितके जास्त काम तितकी जास्त कमाई असे समीकरण असल्यामुळे तुम्हाला एखादा मोठा हात मारावासा वाटेल, पण निष्णात व्यक्तींचा सल्ला घेतल्याशिवाय काहीही करू नका. नोकरीमध्ये एखादी नवीन जबाबदारी वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील जी नंतर तुम्हाला पेलवणार नाही. घरामध्ये भविष्यातील खर्चाची, संचयाची अगोदर तरतूद करून ठेवा.

मकर या आठवडय़ात जीवनाचा थोडासा आस्वाद घेण्याकडे तुमचा कल राहील. याचा समन्वय साधण्यासाठी कामाच्या वेळी काम आणि इतर वेळी आराम असा मार्ग तुम्ही शोधून काढाल.  व्यापार-उद्योगातील एखादे कंटाळवाणे काम आटोक्यात येईल. गरजेइतके पसे हातात पडण्याचे संकेत मिळतील. नोकरीच्या ठिकाणी सगळी कामे स्वत: न हाताळता योग्य व्यक्तींची योग्य कामाकरिता तुम्ही निवड कराल.  घरामध्ये बरेच दिवस लोंबकळत पडलेला कार्यकम निश्चित होईल.

कुंभ वाढणाऱ्या खर्चाची नांदी करणारे हे ग्रहमान आहे, पण हे खर्च चांगल्या कारणाने असल्याने तुम्ही त्याचा बाऊ करणार नाही.  व्यापार-उद्योगात जे काम तुमच्या हातात आहे ते वास्तविक पाहता भरपूर असेल, परंतु तुम्हाला अजून जास्त काम मिळावे असे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी कष्टाची पर्वा न करता हातात घेतलेले काम मार्गी लावाल. घरामध्ये तुमच्या कल्पना खर्चीक असतील; त्या इतरांना लगेच पटणार नाहीत. स्वत:च्या किंवा प्रिय व्यक्तीच्या स्वास्थ्याविषयी चिंता वाटेल.

मीन ग्रहमान ‘पेरल्याशिवाय उगवत नाही’ याची आठवण करून देणारे आहे. कधी कधी कष्टाचा कंटाळा येईल, पण पुन्हा एकदा नव्या उमेदीने कामाला लागाल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात एखादे नवीन आणि मोठे प्रोजेक्ट तुमचे लक्ष वेधतील. कळत नकळत तुम्हाला त्याच्याविषयी आकर्षण वाटू लागेल. नोकरीमध्ये तुमच्या कामात एक नवीन जोम आणि उत्साह दिसून येईल. घरामध्ये आवडत्या व्यक्तीचे हट्ट आणि मागण्या थोडय़ाशा महागडय़ा असतील.
विजय केळकर -Response.lokprabha@expressindia.com