01vijay1मोष उमद्या स्वभावाची रास असल्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी तुमचे स्वागत होते. व्यवसाय-उद्योगात काळाजी गरज म्हणून न आवडणाऱ्या व्यक्तींशी हातमिळवणी करावी लागेल. नोकरीमध्ये आवडत्या व्यक्तीबरोबर काम करायला मिळाल्यामुळे तुम्ही खूश असाल. घरामध्ये निष्णात व्यक्तीच्या सल्ल्यामुळे अवघड प्रश्नात मार्ग मिळेल. तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. लांबलेला घरगुती कार्यक्रम घाईत पार पडेल.

वृषभ एखादे उद्दिष्ट ज्या वेळी तुमच्यासमोर असते त्या वेळी तुम्ही इतर कोणत्याच गोष्टीत लक्ष घालत नाही. या एकाग्रतेचा तुम्हाला फायदा मिळेल. व्यापार-उद्योगात आवश्यक तेवढी कमाई करू शकाल. कर्जासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश लाभेल. जोडधंद्यातून फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी विशिष्ट कामगिरीकरिता विशेष भत्ते किंवा सवलती मिळतील. घरामध्ये एकाच वेळी अनेक व्यवधाने योग्य नियोजन करून  तुम्ही सांभाळाल.

मिथुन उत्तम कल्पनाशक्तीला कृतीची थोडीशी जोड दिली तर यशाचे प्रमाण द्विगुणित होईल. व्यवसाय किंवा उद्योगात स्पर्धकांच्या पुढे जाण्यासाठी एखादे ठोस पाऊल उचलाल. जनसंपर्क आणि जाहिरातबाजी धंद्यासाठी अपरिहार्य होईल. पशाची आवक वाढल्याने तुम्हाला अधिक उत्साहाने काम करावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा गरसमज चांगले काम करून दूर करू शकाल. घरामध्ये लांबलेले काही बेत फेरविचारात घेतले जातील.

कर्क त्यंत महत्त्वाची कामे आहेत काही कारणाने लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या मनात काही पर्यायी बेत असतील तर त्याचा विचार करा. सप्ताहाच्या शेवटी एखादी खूशखबर कळल्यामुळे तुमची निराशा कमी होईल. नोकरीच्या ठिकाणी सोप्या वाटलेल्या कामात गुंतागुंत निर्माण होईल. घरामध्ये डागडुजी, वस्तूंची दुरुस्ती अशा गोष्टींत लक्ष घालावे लागेल. एखाद्या व्यक्तीच्या समस्येमध्ये तोडगा शोधण्याचे काम तुम्ही कराल. पण त्यांना ते पटणार नाही.

सिंह सर्व काही व्यवस्थित चालू असेल, पण तुम्हाला मनमानी करण्याचा मोह निर्माण होईल. व्यापार-उद्योगातील प्राप्तीचे प्रमाण मनाप्रमाणे राहील. कारखानदारांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याकरिता छोटीशी परदेशवारी  करावीशी वाटेल. नोकरीच्या ठिकाणी संस्थेची गरज म्हणून तुमच्या कामाच्या स्वरूपात थोडेसे फेरफार केले जातील. घरामध्ये सगळ्यांनी तुमच्याच पद्धतीने वागावे, असा तुमचा आग्रह असेल. त्याला इतरांकडून विरोध होईल.

कन्या जी गोष्ट तुम्ही मनामध्ये आणाल ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला चन पडणार नाही. व्यापार-उद्योगात सध्या जे काम चालू त्यामध्ये प्राप्ती आणि समाधान चांगले असले तरीही तुम्हाला विस्तार करावासा वाटेल. पशाची अडचण सुटल्यामुळे तुमच्यावर आता कोणीही बंधन घालू शकणार नाही. नोकरीमध्ये वरिष्ठांना अडचणीच्या वेळेला तुम्ही मदत कराल. त्याच्या बदल्यात त्यांच्याकडून एखादी विशेष सवलत मिळवाल.  घरामध्ये एखादे मंगलकार्य ठरेल.

तुळ ग्रहमान चांगले असल्यामुळे तुम्हाला खूप काही करावेसे वाटेल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या चांगल्या कामाला गिऱ्हाईकांकडून पावती मिळेल. कारखानदार नवीन बाजारपेठ शोधण्यासाठी परदेशवारी करतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या सल्ल्याला मान देतील. बेकार व्यक्तींनी मिळेल ते काम ताबडतोब स्वीकारावे. घरामध्ये इतरांना पाहिजे त्या वेळी मदत करून तुम्ही उपकृत कराल. त्यांचा दुवा मिळेल.

वृश्चिक नशिबापेक्षा प्रयत्नावर जास्त विश्वास ठेवा आणि पुढे चला. व्यापार-उद्योगात जरी नवीन काम मिळत असले तरी खेळते भांडवल आणि तांत्रिक अडचणी यामुळे तुमचे हातपाय बांधल्यासारखे वाटेल. बाजारातील घडामोडींनुसार तुम्हाला तुमचा पवित्रा बदलावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी जे काम तुम्हाला आवडत नव्हते ते काम तुम्ही चिकाटीने करून दाखवाल. प्रकृतीला सांभाळून एकंदरीत कामाचे नियोजन करा. अचानक येणाऱ्या पाहुण्यांमुळे तुमची धावपळ उडेल.

धनू एखादी गोष्ट मिळविण्याकरिता तुम्ही जेव्हा अधीर असता त्या वेळी कोणतेही धाडस करण्याची तुमची तयारी असते. या आठवडय़ात तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याकरिता तुम्ही  सतर्क असाल. व्यापार-उद्योगात योग्य व्यक्तींशी संगत करा. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादी अवघड जबाबदारी तुमच्यावर टाकतील. घरामध्ये रंगरंगोटीला प्राधान्य द्यावे लागेल. मुलांच्या गरजा भागविण्याकरिता वेळ आणि पसे हातात ठेवा. हवापालटाकरिता छोटीशी ट्रिप काढाल.

मकर जे काम तुम्हाला मनापासून आवडते त्या कामात विलंब होईल. याउलट न आवडणारे काम तातडीने पार पाडावे लागेल. व्यवसाय-उद्योगात आíथक स्थिती सुधारण्याकरिता अहोरात्र प्रयत्न कराल. नोकरीत वरिष्ठ तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीत. बेकार व्यक्तींनी मिळणाऱ्या संधीचा फायदा घ्यावा. घरामध्ये लांबवलेले एखादे कार्य घाईने उरकायला लागेल. ‘आमदनी अठन्नी खर्च रुपैया’ असा प्रकार होईल. पशाचा विचार न करता आहे त्या क्षणाचा आनंद घ्याल.

कुंभ प्रत्येक काम काही काळापुरते चालू राहते आणि नंतर सर्व काही ठप्प होते, ही मोठय़ा बदलाची नांदी असते. अशी संवेदना तुमच्या मनात निर्माण होईल. सभोवतालच्या वातावरणाचा नीट अभ्यास करा. व्यापार-उद्योगात कोणतेही बेत ठरविण्यापूर्वी स्पर्धकांच्या हालचालींचा अंदाज घ्या. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या आणि संस्थेच्या धोरणानुसार तुम्हाला कामाची पद्धत बदलावी लागेल. घरामध्ये एखाद्या प्रश्नावर खट्टा-मीठा असा अनुभव येईल.

मीन समुद्रात जशी भरती आणि ओहोटी चालू असते त्याप्रमाणे तुमचे मूड बदलत राहतील.  व्यापार-उद्योगामध्ये कामाचे प्रमाण थोडेसे कमी असेल. तुमच्या मनात उलटसुलट शंका चालू होतील. पशाचे प्रमाण आवश्यकतेनुसार असेल. नोकरीमध्ये  पूर्वी अर्धवट राहिलेली कामे हातावेगळी करा. घरामध्ये छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमांमध्ये इतरांना तुमचा सहवास हवाहवासा वाटेल. एखाद्या सदस्याच्या प्रश्नामध्ये तुम्ही चांगला तोडगा शोधून काढाल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com