08 March 2021

News Flash

दि. १६ ते २२ मार्च २०१८

‘पेरल्याशिवाय उगवत नाही’ याची आठवण करून देणारा आठवडा आहे.

मेष ‘पेरल्याशिवाय उगवत नाही’ याची आठवण करून देणारा आठवडा आहे. जे काम तुम्ही आता करणार आहात त्याचा नजीकच्या भविष्यात चांगला उपयोग होईल. व्यापार-उद्योगात नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील संभाव्य धोके समजून घ्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा शब्द पाळण्यासाठी न आवडणारे काम करावे लागेल. घरामध्ये वस्तूंची मोडतोड, पाहुण्यांचा पाहुणचार याकरिता तजवीज करावी लागेल.

वृषभ तुमच्या दृष्टीने जी महत्त्वाची कामे आहेत, ती आठवडय़ाच्या सुरुवातीला उरका. नंतर त्यामध्ये गरसोय आणि विलंब सहन करावा लागेल. व्यापार-उद्योगात वसुलीवर भर द्या, पण त्याकरिता गिऱ्हाईकांना दुखवू नका. जोडधंदा असेल तर तुम्हाला एक प्रकारचा आधार वाटेल. नोकरीमध्ये जे काम तुमच्यावर सोपवले आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडाल. घरामध्ये इतरांच्या कलाने वागायला लागल्यामुळे मधूनच तुमची चिडचिड होईल.

मिथुन एखादी नवीन गोष्ट साध्य करायची असते, त्या वेळी आपण इतर गोष्टींकडे थोडेसे दुर्लक्ष करतो, तशी तुमची या आठवडय़ात स्थिती होणार आहे. व्यापार-उद्योगात नवीन व्यक्तींशी संबंध येईल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या नवीन वातावरणात काम करण्याचा योगायोग चालून येईल. त्यातून तुम्ही एक नवीन आणि चांगला अनुभव घ्याल. घरातील एखाद्या प्रश्नावरून तुमचे इतरांशी मतभेद होतील. तुम्ही त्याचा जास्त विचार करू नका.

कर्क ग्रहमान जणू काही तुमची परीक्षा पाहणारे आहे. जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे त्याकरिता अहोरात्र मेहनत करावी लागेल. व्यवसाय-उद्योगातील नवीन संधीसाठी आवश्यक असणाऱ्या व्यक्तींची आणि साधनसामग्रीची जुळवाजुळव कराल. कारखानदारांना प्रचंड कष्ट करावे लागतील. नोकरीमध्ये वरिष्ठांचे समाधान करण्याकरिता तुम्हाला मानेवरती जू ठेवून काम करावे लागेल. घरामध्ये वादविवादावर समेट घडेल.

सिंह एखादी गोष्ट मनामध्ये आली की, ती पूर्ण होईपर्यंत तुम्हाला चन पडत नाही. मग त्याकरिता किती पसे खर्च होतात त्याचा विचारही करत नाही. पण या आठवडय़ात तुम्ही थोडेसे व्यवहारी बनलात तर तुमचाच फायदा होईल. व्यापार-उद्योगात ज्या कामातून पसे मिळतील अशा कामांना प्राधान्य द्या.  नोकरीच्या ठिकाणी केलेले काम एकदा तपासून पाहा. घरामध्ये माझे तेच खरे हा स्वभाव बाजूला ठेवून सर्वाशी प्रेमाने वागा.

कन्या एक चांगले तर एक वाईट तुमच्या वाटय़ाला येणार आहे. ज्या व्यक्तींवर तुम्ही भरवसा ठेवणार आहात, त्यांच्याकडून मदत मिळणार नाही पण दुसऱ्या मार्गाने मदत मिळाल्याने तुम्ही वेळ मारून नेऊ शकाल. व्यापार उदयोगात एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने घ्यायचे असा अनुभव येईल. नोकरीच्या ठिकाणी आठवडा प्रचंड धावपळीत जाईल. घरामध्ये एखादया सदस्याच्या प्रकृती किंवा स्वास्थ्याविषयी चिंता वाटेल.

तूळ सर्व ग्रहमान तुमचे कष्ट वाढविणारे आहे. अगदी सोप्या सोप्या कामामध्ये खूप वेळ गेल्यामुळे या आठवडय़ात तुमची चिडचिड होईल. व्यापार-उद्योगात कामाचा वेग वाढविण्याकरिता एखादा शॉर्टकट घ्यावासा वाटेल. त्या पद्धतीने काम केल्यावर असे लक्षात येईल की, आपली नेहमीचीच कार्यपद्धती चांगली होती. घरामध्ये कामाचा तणाव वाढल्यामुळे वडय़ाचे तेल वांग्यावर निघण्याची शक्यता आहे. स्वत:च्या प्रकृतीला सांभाळा.

वृश्चिक या आठवडय़ाच्या सुरुवातीला सर्व गोष्टी सरळ आणि सोप्या वाटतील, पण कामाला लागल्यानंतर त्यामध्ये किती कष्ट आहेत हे तुम्हाला कळेल. व्यापार-उद्योगात महत्त्वाचे काम शक्यतो स्वत:च पूर्ण करा. नोकरीच्या ठिकाणी तुमची काहीही चूक नसताना एखादे काम तुम्हाला परत करावे लागेल. त्यामुळे ठरलेले काम मागे ठेवणे भाग पडेल. घरामध्ये सर्व जण तुमचा गरफायदा घेतील. पण त्यांना तसे बोलून दाखविले तर त्यांना राग येईल.

धनू काही तरी मिळविण्याकरिता काही तरी गमवावे लागते याचा अनुभव देणारे ग्रहमान आहे. तुमची इच्छा असूनही तुम्ही करिअरमध्ये लक्ष घालणार नाही. व्यापार-उद्योगात आठवडय़ाचा मध्य तुम्हाला अनुकूल आहे. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामात तुम्ही आळस केला होता त्या कामाची वरिष्ठांना एकदम आठवण येईल. ते काम पूर्ण करणे भाग पडेल. घरामधल्या व्यक्तींचे कितीही केले तरी त्यांचे समाधान होणार नाही.

मकर तृतीय स्थानामधला बुध वक्री होणार आहे. सकृद्दर्शनी सर्व काही चांगले दिसेल, पण मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी एखादी उणीव तुम्हाला जाणवत राहील. प्रवासाच्या वेळेला आपली कागदपत्रे नीट जपा. गिऱ्हाईकांच्या शब्दाला मान द्या. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कामाचा थोडासा अहंकार वाटेल, पण सहकाऱ्यांना मात्र तुमच्याविषयी असुया वाटणार आहे, हे लक्षात ठेवा. घरामध्ये तुम्ही जर कोणाला आश्वासन दिले असेल तर ते पूर्ण करा.

कुंभ इतरांच्या घोटाळ्यात न पडता एकटय़ाने काम करणे तुम्हाला आवडते. तुमची ही इच्छा पूर्ण होईल. व्यापारामध्ये हातातोंडाशी आलेले काम १-२ आठवडे लांबवावे लागेल. पण त्याचा तुमच्या आíथक प्राप्तीवर परिणाम होणार नाही. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याला वाव असल्यामुळे तुम्ही खूश असाल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये इतरांचे विचार जरी पटले नाहीत तरी ते शांतपणे ऐकून घ्या.

मीन कोणतेही काम करताना तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या मदतीची गरज असते. पण या आठवडय़ात मात्र तुम्हाला एकटय़ाने काम करावे लागते आणि ते काम यशस्वीरीत्या पार पडल्याने तुम्ही खूश असाल. व्यापार-उद्योगात एखादी नवीन युक्ती वापरून तुम्हाला काम आटोक्यात आणावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी जे काम तुमच्या हातामध्ये आहे ते व्यवस्थितरीत्या पूर्ण करा.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 1:01 am

Web Title: astrology from 16 to 22 march 2018
Next Stories
1 दि. ९ ते १५ मार्च २०१८
2 दि. २ ते ८ मार्च २०१८
3 दि. २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०१८
Just Now!
X