News Flash

भविष्य : दि. १८ ते २४ ऑगस्ट २०१७

अचानक कुठून तरी पैसे उपलब्ध होतील.

marathi rashi bhavishya, astrology in marathi, rashi bhavishya in marathi, bhavishya in marathi, marathi bhavishya, rashi bhavishya in marathi by birth date, marathi astrology, horoscope in marathi, janam kundali in marathi, kundali in marathi, jyotish in marathi, rashi bhavishya in marathi today, marathi jyotish, jyotish marathi, rashi bhavishya marathi, पंचांग, राशी भविष्य मराठी, योगेश मुळे, yogesh mulay
daily horoscope

मेष एखाद्या नवीन कल्पनेने भारून जाऊन त्याच्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करण्याची तुमची तयारी असेल. व्यापार-उद्योगात ज्या मार्गाने पसे अपेक्षित होते, त्या मार्गाने ते न मिळाल्यामुळे तुमची थोडीशी निराशा होईल. पण अचानक कुठून तरी पैसे उपलब्ध होतील. नवीन प्रोजेक्टचा श्रीगणेशा या आठवडय़ात करू नका. नोकरीच्या ठिकाणी दुसऱ्यावर विसंबून न राहता तुम्ही तुमचे काम वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडा.

वृषभ तुमच्या रसिक स्वभावाला खतपाणी घालणारे हे ग्रहमान आहे. जे काम तुम्ही कराल त्यामध्ये आपले वेगळेपण दिसायला पाहिजे असा तुमचा आग्रह असेल. व्यापार-उद्योगात मालाची विक्री वाढविण्याकरिता स्वत:ची टिमकी मिरवावी लागेल. नोकरीमध्ये तुमच्या आवडीचे काम तुम्ही तातडीने पार पाडाल. पण जे काम तुम्हाला आवडत नाही त्यात चालढकल कराल. घरामध्ये आवडत्या आणि नावडत्या पाहुण्यांची हजेरी लागेल. तुम्ही मात्र चेहऱ्यावर हसू ठेवून सगळ्यांचे स्वागत कराल. वाहन, जागा खरेदीचे निर्णय घाईने घेऊ नका.

मिथुन एखाद्या नावीन्यपूर्ण कल्पनेने तुम्ही भारून गेलेले असाल. ती कल्पना जोवर प्रत्यक्षात उतरत नाही तोवर तुमच्या जिवाची घालमेल होईल. व्यापारी वर्गाला मनाप्रमाणे काम मिळेल. पशाची आवक वाढल्यामुळे एखाद्या नवीन योजनेचा श्रीगणेशा करावासा वाटेल. गिऱ्हाईकांचे काम वेळेत पूर्ण करावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी तेच तेच काम केलेले तुम्हाला आवडणार नाही. पण थोडेसे वेगळे काम असेल तर त्यामध्ये आपणहून लक्ष घालाल. घरामध्ये एखादा महागडा बेत ठरेल.

कर्क या आठवडय़ात जे काम तुम्ही हातामध्ये घ्याल ते तुमच्या मनाप्रमाणे पार पडल्याशिवाय जिवाला स्वस्थता लाभणार नाही. व्यापार-उद्योगात भरपूर काम असेल. गिऱ्हाईकांना खूश करण्यासाठी जिभेवर साखर पेराल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी आपल्या कामाची स्तुती करावी यासाठी बढाया माराल. घरामध्ये काम करताना तुमच्यातील रसिकता, कर्तव्यदक्षता दिसून येईल. वेगळ्या व्यक्तींच्या वर्तुळात राहिल्यामुळे जीवनाचा आनंद घेतल्यासारखे वाटेल.

सिंह कोणताही मोठा कार्यक्रम पुढे असला की तुम्ही एकदम उत्साही असता. या आठवडय़ात आलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा तुमचा इरादा असेल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना खूश ठेवण्यासाठी वेळप्रसंगी थोडासा तोटा सोसण्याची तयारी असेल. पशाची आवक चांगली असेल. नोकरीमध्ये ठरविलेले काम वेळेपूर्वी पूर्ण करून लवकर घरी पळ काढाल. घरामध्ये नातेवाईक, मित्रमंडळी यांचा वावर असेल.

कन्या पशावर प्रेम करणारी तुमची रास आहे. कधी कधी जास्त पसे मिळवण्याकरिता तुम्ही स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करता. या आठवडय़ात तुम्हाला तुमचे स्वास्थ्य जपले पाहिजे. व्यापारी वर्गाला पशाचा सतत ओघ चालू राहिल्याने खूप काम करावेसे वाटेल. जुन्या ओळखींचा उपयोग झाल्याने नवीन कामाचा ‘श्रीगणेशा’ करता येईल. नोकरीमध्ये कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडाल. पण प्रत्येक काम उरकण्यासाठी खूप घाई करावी लागेल. घरामध्ये काही बेत पूर्वी ठरविले असतील तर ते मनाप्रमाणे पार पडतील.

तूळ आजकालच्या दुनियेत कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर त्याला पशाचे पाठबळ आवश्यक असते. या आठवडय़ात तुमच्या खिशात पसे खुळखुळल्याने तुम्ही एकदम खूश असाल. व्यापार-उद्योगात पशाचा ओघ सतत चालू राहील. जे काम तुम्ही पूर्वी पूर्ण केले होते त्याचे पसे मिळवण्याची शक्यता दिसू लागेल. नोकरीमध्ये प्रत्येक काम घाईगडबडीत पार पाडाल. घरामध्ये चतन्यमय वातावरण राहील. तुम्ही सगळ्यांचा आपुलकीने पाहुणचार कराल.

वृश्चिक अत्यंत चिवट आणि चिकट अशी तुमची रास आहे. कठीण परिस्थितीत तुम्ही शांत राहता आता ग्रहमान चांगले असल्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांत तुम्ही जी गरसोय सहन केलीत त्याची कसर भरून काढायची असे तुम्ही ठरवाल. व्यापार-उद्योगात पुढील तीन-चार महिन्यांत प्रगती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची तयारी करून ठेवाल. नोकरीच्या ठिकाणी लांबलेले प्रोजेक्ट सुरू होण्याची शक्यता दिसू लागेल.  घरातील प्रत्येक कामात तुमचा पुढाकार राहील.

धनू ग्रहमान पेरल्याशिवाय उगवत नाही याची आठवण करून देणार आहे. जे काम तुम्ही करणार आहात त्याचे फळ तुम्हाला एक-दोन आठवडय़ांनंतर मिळेल. व्यापार-उद्योगात अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करून टाका. सरकारी कामे किंवा कोर्ट व्यवहारात विलंब करून चालणार नाही. नोकरीच्या ठिकाणी एखादे काम इतका वेळ घेईल की बाकी कामे बाजूला ठेवावी लागतील. घरामध्ये जी गोष्ट तुम्ही इतरांना शांतपणे सांगाल ती त्यांना पटेल.

मकर कोणतेही काम हातात घेण्यापूर्वी त्यातील बजेटचा तुम्ही खूप विचार करता. पण या आठवडय़ामध्ये सभोवतालच्या व्यक्तींमुळे तुमचे बजेट कोलमडून पडेल. व्यापार-उद्योगात बरेचसे व्यवहार उधारीचे असल्यामुळे हातात रोख रक्कम कमी असेल. नोकरीमध्ये हातचे राखून काम कराल. ज्या कामातून तुमचा फायदा आहे त्या कामाला महत्त्व द्याल. घरामध्ये एखादा मोठा बेत ठरण्याची शक्यता आहे. तो पूर्ण करण्याकरिता टीमवर्कला मदत करा. महिलांना त्यांच्या हौसेवर मुरड घालावी लागेल.

कुंभ ग्रहमान मानाल तर समाधान अशी परिस्थिती निर्माण करणारे आहे. सर्व बंधने झुगारून देऊन जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद लुटावासा वाटेल. पण रोजच्या धावपळीमुळे ते शक्य होणार नाही. व्यापार-उद्योगात अवघड कामगिरीमध्ये तुम्ही सफल व्हाल. नवीन कार्यपद्धतीचा श्रीगणेशा कराल. नोकरीमध्ये कामाचा पसारा दिसत असूनही तुम्हाला थोडासा कंटाळा येईल. वरिष्ठांच्या गरजेपुरते तुम्ही काम कराल. घरामध्ये सजावट करण्यासाठी एखादी नवीन कल्पना कराल.

मीन ग्रहमान तुमच्या उत्साहाला उधाण आणणारे आहे. अनेक कामांमध्ये तुम्ही आनंदाने सहभागी व्हाल. वेळप्रसंगी स्वत:च्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष कराल. व्यापार-उद्योगात एखादे अनपेक्षित आणि चांगले काम मिळेल. गिऱ्हाईकांनी तुमची प्रशंसा केल्यामुळे तुम्हाला भरून पावल्यासारखे वाटेल. नोकरीमध्ये तुमच्या कामाला महत्त्व येईल.  तुमच्या उत्साहाला उधाण येईल. घरामध्ये एखादे कार्य संपन्न झाल्यामुळे घरातील वातावरण बदलेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2017 1:01 am

Web Title: astrology from 28 to 24 august 2017
Next Stories
1 दि. ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०१७
2 दि. ४ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०१७
3 दि. २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०१७
Just Now!
X