नक्षलवाद्यांचा हिंसाचार व काश्मीर खोऱ्यातील दगडफेक यावर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. परंतु, नक्षलवाद्यांच्या किंवा काश्मीर खोऱ्याशी संबंधित प्रश्नाला भिडण्यासाठी फक्त घोषणा देऊन चालणार नाही तर यासाठी सरकारने र्सवकष धोरण आखण्याची गरज आहे, अशी मांडणी करणाऱ्या ‘धोरणचकव्याचे बळी’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत नक्षलवाद्यांचा प्रश्न चुटकीसरशी सोडवू असे सांगणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी या समस्येची हाताळणी करण्याबाबतचे धोरण गेल्या तीन वर्षांत आखले नाही. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य धोरणाची आवश्यकता या अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे.

या अग्रलेखावर मत मांडणे विद्यार्थ्यांना सोपे जावे यासाठी ‘लोकसत्ता’ने नक्षलवादी चळवळीचे अभ्यासक प्रा. रश्मी सोहनी व ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचे प्रमुख देवेंद्र गावंडे यांना बोलते केले आहे. त्यांच्या मताचा विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहिताना उपयोग होईल. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.

‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना  indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.

लक्षात ठेवावे असे..

‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना यूजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी  loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.