शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याची घोषणा केल्यानंतर झालेल्या भाजपच्या पहिल्याच सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर शरसंधान साधले आहे. शिवसेनेला कौरवांची उपमा देत आता धर्मयुद्ध होऊनच जाऊ द्या, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रचाराचे रणशिंग फुंकले. आमची औकात काय आहे, हे २१ फेब्रुवारीला दाखवू, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हटले.

Live Updates
19:46 (IST) 28 Jan 2017
शिवसेना दुटप्पी, धर्मयुद्ध होऊनच जाऊ द्या- मुख्यमंत्री
19:43 (IST) 28 Jan 2017
आमची निवडणूक विकासाची, अजेंडा विकासाचा- मुख्यमंत्री
19:41 (IST) 28 Jan 2017
मराठी माणसाच्यामागे भाजप राहिला. मराठी-अमराठी भेद करायचा नाही- मुख्यमंत्री
19:39 (IST) 28 Jan 2017
कोस्टल रोड प्रकल्पामुळे कोळीवाड्यांना त्रास होणार नाही. त्यांचे पुनर्वसन सरकार करणार- मुख्यमंत्री
19:38 (IST) 28 Jan 2017
मुंबई मराठा माणसांची; मुंबईतून मराठी माणसाला कोणीही बाहेर काढू शकत नाही- मुख्यमंत्री
19:36 (IST) 28 Jan 2017
कोस्टल रोडबद्दल शिवसेनेची भूमिका दुटप्पी- मुख्यमंत्री
19:36 (IST) 28 Jan 2017
महानगरपालिकेत सत्ता आल्यावर गरिबांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी काम करणार- मुख्यमंत्री
19:35 (IST) 28 Jan 2017
मुंबई-नवी मुंबई सागरी सेतूने जोडणार- मुख्यमंत्री
19:34 (IST) 28 Jan 2017
गेल्या २ वर्षांमध्ये सगळ्या सिग्नलवर सीसीटीव्ही- मुख्यमंत्री
19:33 (IST) 28 Jan 2017
जे सोबत येतील त्यांच्यासोबत किंवा त्यांच्याशिवाय परिवर्तन अटळ- मुख्यमंत्री
19:31 (IST) 28 Jan 2017
आम्ही करुन दाखवलो म्हणणारे नाहीत, आम्हाला जनताच सांगते तुम्ही करुन दाखवलं- मुख्यमंत्री
19:26 (IST) 28 Jan 2017
भाजपची औकात २१ फेब्रुवारीला दाखवू- मुख्यमंत्री
19:25 (IST) 28 Jan 2017
जनतेचा कौल पारदर्शी कारभाराला- मुख्यमंत्री
19:24 (IST) 28 Jan 2017
शिवसेना वैचारिक शत्रू नाही, मात्र भ्रष्टाचाराला विरोध आहे- मुख्यमंत्री
19:23 (IST) 28 Jan 2017
कोणासोबतही फरफटत जाऊ नका, हा धडा आम्हाला २५ वर्षांच्या युतीने दिला- मुख्यमंत्री
19:22 (IST) 28 Jan 2017
२५ वर्षे आमच्यामुळे तुमचा महापौर झाला- मुख्यमंत्री
19:22 (IST) 28 Jan 2017
मी पारदर्शकतेवर बोललो, ही माझी चूक आहे- मुख्यमंत्री
19:21 (IST) 28 Jan 2017
तुमच्यामुळे मुंबईचे नुकसान झाले- मुख्यमंत्री
19:20 (IST) 28 Jan 2017
मुख्यमंत्र्यांकडून संजय राऊत यांना शकुनी मामाची उपमा
19:20 (IST) 28 Jan 2017
आजही शकुनी मामाच्या रुपात अनेकजण पाहायला मिळतात- मुख्यमंत्री
19:19 (IST) 28 Jan 2017
ताकद वाढली तरी ६० जागांचा प्रस्ताव दिलात, तेव्हाच समजलं तुम्हाला युती नकोय- मुख्यमंत्री
19:16 (IST) 28 Jan 2017
पारदर्शकतेला आमचे प्राधान्य आहे- मुख्यमंत्री
19:14 (IST) 28 Jan 2017
तुमच्या विचारांशी फारकत नाही, तुमच्या आचाराशी फारकत आहे- मुख्यमंत्री
19:12 (IST) 28 Jan 2017
युती तुटल्यामुळेच मुख्यमंत्री झालो- मुख्यमंत्री
19:12 (IST) 28 Jan 2017
विधानसभेवेळी युती तुटल्याने आम्हाला आमची ताकद समजली- फडणवीस
19:11 (IST) 28 Jan 2017
आम्ही विधानसभेवेळी कमीपणा घेतला होता, मात्र शिवसेनेने युती तोडली- फडणवीस
19:10 (IST) 28 Jan 2017
विधानसभेवेळी आम्ही १४७ जागा द्यायला तयार होतो, मात्र शिवसेनेने १५१ जागांचा हट्ट धरला- फडणवीस
19:09 (IST) 28 Jan 2017
आम्ही जुगलबंदी करणारे नाही, आम्ही नोटाबंदी करणारे लोक आहोत- फडणवीस
18:58 (IST) 28 Jan 2017
१९९३ची दंगल आठवणारे १९९५नंतरचा काळ विसरतात- शेलार
18:57 (IST) 28 Jan 2017
दुसऱ्याचा खून पाडून पक्ष मोठा करणे, ही आमची संस्कृती नाही- शेलार