उद्यापासून तीन दिवस मुंबईत प्रचारसभा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसबरोबर आघाडीची शक्यता मावळल्याने राष्ट्रवादीने मुंबईत अधिक लक्ष केंद्रित केले असून, खासदार सुप्रिया सुळे उद्यापासून तीन दिवस प्रचार करणार आहेत. पक्षाने सुप्रियाताईंकडे प्रचाराची धुरा सोपविली आहे.

राष्ट्रवादीने आतापर्यंत ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आणखी काही उमेदवारांची नावे येत्या दोन दिवसांत जाहीर केली जातील. मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रचाराची सुरुवात उद्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. परळच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात महिला मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे. असे मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी स्पष्ट केले. उद्या सायंकाळी उपनगरातील  प्रचार कार्यालयांचे उद्घाटन सुप्रिया यांच्या हस्ते होईल.  घाटकोपर, चेंबूर ते मुलुंड परिसरात त्यांच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसांत १५ सभा किंवा कार्यालयांचे उद्घाटन सुळे यांच्या हस्ते होईल.

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule will lead ncp campaign for bmc election
First published on: 17-01-2017 at 02:29 IST