scorecardresearch

Budget 2022 : अर्थमंत्र्यांची सेमी हायस्पीड ट्रेन्सची भेट; पुढील तीन वर्षांत धावणार ४०० नवीन वंदे भारत एक्सप्रेस

येत्या तीन वर्षांत या गाड्या चालवल्या जातील, असे अर्थमंत्री म्हणाल्या

Budget 2022 new 400 Vande Bharat Express trains to run in next three years
(फोटो सौजन्य-PTI)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. देशाचा आर्थिक विकास दर ९.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे. हा अर्थसंकल्प पुढील २५ वर्षांसाठी ब्लू प्रिंटचे काम करणार आहे. याशिवाय या अर्थसंकल्पातून ६० लाख नोकऱ्या निर्माण करण्यात येणार आहेत, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले. एलआयसीच्या आयपीओवर काम सुरू असून येत्या काही दिवसांत आणखी काही गोष्टींची निर्गुंतवणूक केली जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

तसेच पुढील तीन वर्षांत ४०० वंदे भारत गाड्या धावणार आहेत. येत्या तीन वर्षांत या गाड्या चालवल्या जातील. याशिवाय १०० पीएम गती शक्ती कार्गो टर्मिनल विकसित केले जातील, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. यामुळे अर्थसंकल्पामध्ये सुवर्ण चतुर्भुज मार्गावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या मार्गांवर ताशी १८० ते २०० किमी वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस सेमी-हायस्पीड ट्रेन्स चालवण्याची घोषणा केली आहे.

Budget 2022: ई-पासपोर्टची अर्थमंत्र्यांची घोषणा!; इलेक्ट्रॉनिक चीप असणाऱ्या पासपोर्टचे फायदे काय? जाणून घ्या

वंदे भारत ट्रेनमध्ये नवीन काय असेल?

नवीन ट्रेनमध्ये रिक्लाइनिंग सीट्स, बॅक्टेरिया फ्री एअर कंडिशनिंग सिस्टीमचा वापर, पुशबॅक फीचर मिळेल. ट्रेनच्या तापमानापासून ते प्रत्येक इलेक्ट्रिक बोर्डपर्यंत सर्व आवश्यक यंत्रणांचे निरीक्षण करण्यासाठी एक केंद्रीकृत कोच असेल, जिथे संपूर्ण ट्रेनचे निरीक्षण केले जाऊ शकते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, प्रत्येक डब्यात चार आपत्कालीन खिडक्या असतील ज्यातून प्रवाशांना बाहेर काढता येईल.

ट्रेनमध्ये पावसाळा आणि पूरसदृश परिस्थितीसाठी खास डिझाइन केलेले उपकरणे असतील जेणेकरुन पाण्याच्या संपर्कात ते खराब होऊ नये. याशिवाय प्रत्येक डब्यात खास मोठे दिवे असतील जे दीर्घकाळ टिकतील. वीज खंडित झाल्यास तीन तास व्हेंटिलेशन देखील उपलब्ध असेल. याशिवाय प्रत्येक डब्यात आपत्कालीन पुश बटणांची संख्या वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत ट्रेनच्या एका डब्यात दोन बटणे होती, नवीन ट्रेनमध्ये चार बटणे असतील. तसेच प्रवासी माहिती प्रणाली आणि डोअर सर्किट्समध्ये फायर सर्व्हायव्हल केबल्सचा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून आग लागल्यास दरवाजे आणि खिडक्या उघडता येतील.

मराठीतील सर्व Budget 2022 ( Budget ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Budget 2022 new 400 vande bharat express trains to run in next three years abn

ताज्या बातम्या