scorecardresearch

Budget 2022 : शेअर बाजाराकडून बजेटचं स्वागत; सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

Union Budget 2022 : सेन्सेक्स ५९ हजार अंकांच्या जवळपास पोहचला आहे

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

Union Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. एकीकडे अर्थसंकल्प सादर होत असताना दुसरीकडे शेअर बाजाराकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत होताना दिसत आहे. शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून येत असून, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी पाहायला मिळाली आहे.

सध्या सेन्सेक्स ९१४ अंकांच्या उसळीसह ५९ हजार अंकांच्या जवळपास आहे. तर निफ्टीने देखील २०० अंकांपेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. र्थसंकल्पातील घोषणांवर गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक मजबूत झाले आहेत. अर्थसंकल्पाच्या घोषणेदरम्यान सन फार्मा, इंडसइंड बँक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक आणि अल्ट्राटेक सिमेंटमध्ये चांगला खरेदीचा कल दिसून आला.

Budget 2022 Live: एलआयसीचा आयपीओ बाजारात येणार – निर्मला सीतारामन

अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पात ‘गती शक्ती’ योजनेची घोषणा झाल्यानंतर पायाभूत सुविधांच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. इन्फ्रा कंपन्यांचे शेअर्स ७ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. यामध्ये पीएनसी इन्फ्राटेकच्या शेअरने सर्वाधिक ६.६१ टक्के वाढ दर्शविली.

Share market – Budget 2022 : शेअर बाजार करणार विक्रम! दहा वर्षांच्या इति‍हासातून जाणून घ्या, कशी असेल बाजाराची वाटचाल?

दूरसंचार क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात घोषणा झाल्यानंतर आयडियाच्या शेअरमध्ये लक्षणीय वाढ झाली. कंपनीच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे. तर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात दूरसंचार क्षेत्रासाठी वेगळी घोषणा केल्यानंतर, या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले.

मराठीतील सर्व Budget 2022 ( Budget ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Budget welcome from stock market sensex surges 900 points msr

ताज्या बातम्या