Citigroup Accidental Transaction Mistake: तुमच्या बँक खात्यात अचानक काही कोट्यवधींची रक्कम आली तर? ही रक्कम जवळपास ८१ लाख डॉलर एवढी रक्कम असेल तर? जर-तर सोडून द्या. पण अमेरिकेत एका ग्राहकाच्या खात्यात खरंच चुकून एवढी मोठी रक्कम बँकेकडून वळती केली गेली. खरंतर बँकेला एका ग्राहकाच्या खात्यात केवळ २८० डॉलर (२४ हजार) पाठवायचे होते. पण बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांनी चुकून ८१ लाख डॉलर्स पाठविले. पण व्यवहार झाल्यानंतर दीड तासांनी तिसऱ्या कर्मचाऱ्याचे हे लक्षात आले आणि बँकेने आपली चूक तात्काळ सुधारली.

फायनान्शिएल टाइम्सने हे वृत्त दिले आहे. घटना एप्रिल २०२४ ची आहे. सिटीग्रुप आयएनसीने एका ग्राहकाच्या बँक खात्यात ८१ लाख डॉलर्स चुकून पाठवले. एप्रिल २०२४ मध्ये डॉलरची भारतीय रुपयांमध्ये किंमत ८३.५ एवढी होती.

चूक कशी लक्षात आली?

सिटीग्रुपच्या दोन कर्मचाऱ्यांकडून पैसे पाठविताना ही चूक झाली होती. मात्र ९० मिनिटांनी तिसऱ्या कर्मचाऱ्याला ही चूक लक्षात आली. यादरम्यान पैसे ग्राहकाच्या खात्यात पोहोचले नव्हते. त्यापूर्वीच बँकेने हा व्यवहार रद्द केला, असे सिटीग्रुपवच्या प्रवक्त्याने फायनान्शिएल टाइम्सला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. एवढी मोठी रक्कम पाठविणे तसेही सहज शक्य नव्हते. आमच्या सुरक्षा सिस्टिमने ही चूक तात्काळ लक्षात आणून दिली आणि आम्ही पैसे वळते होण्यापासून रोखले.

सिटीग्रुपकडून आधीही झाल्या होत्या चुका

सिटीग्रुपकडून एवढी मोठी रक्कम चुकून पाठविण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही अशा चुका झालेल्या आहेत. २०२३ मध्ये सिटी बँकेकडून अशा १० घटना घडल्या होत्या. ज्यामध्ये १०० कोटी डॉलर्सची गडबड झाली होती.

तर २०२२ मध्ये १३ घटना घडल्या होत्या. अमेरिकेतील बँकेत अशी घटना घडणे अतिशय दुर्मिळ मानले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ताज्या प्रकरणात ८१ लाख कोटी डॉलर्सची रक्कम बँकेबाहेर जाण्यापासून रोखली गेली. ज्यामुळे बँक आणि ग्राहकाचे नुकसान होण्यापासून वाचले. पण यानंतर बँकिंग प्रणालीमध्ये मोठे सुधार आणण्याची गरज निर्माण झाली आहे.