LPG PRICE Hike : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात काय घोषणा केल्या जाणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. अशात १९ किलोंचा गॅस सिलिंडर १४ रुपयांनी महागला आहे. IOCL च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या व्यावसायिक वापराचा १९ किलोंचा सिलिंडर १४ रुपयांनी महाग झाला आहे. या दरवाढीनंतर व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची किंमत दिल्लीत १७६९ रुपये ५० पैसे इतकी झाली आहे. १ फेब्रुवारी म्हणजेच आजपासून हे दर लागू झाले आहेत.

व्यावसायिक वापराचा सिलिंडर महाग

बजेट सादर होण्यापूर्वीच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर वाढले आहेत. १४ रुपयांनी व्यावसायिक सिलिंडर म्हणजेच १९ किलोंचा सिलिंडर महागला आहे. मुंबईत १७०८ रुपयांना मिळणारा हा सिलिंडर आता आजपासून १७२३ रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीत सिलिंडरची किंमत १७६९ रुपये ५० पैसे झाली आहे. कालपर्यंत हा सिलिंडर दिल्लीत १७५५ रुपये ५० पैसे इतक्या किंमतीला होता. चेन्नईत हा सिलिंडर १९३७ रुपयांना मिळणार आहे. तर कोलकाता येथे १८८७ रुपयांना व्यावसायिक वापराचा सिलिंडर मिळणार आहे.

heat waves, weather,
यंदाचा एप्रिल महिना उष्णतेच्या लाटांचा; पुढील पाच दिवस पारा आणखी वाढणार
Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?

हे पण वाचा- Budget 2024 Live: आज निवडणुकांआधीचा शेवटचा अर्थसंकल्प; सामान्य मतदारांसाठी कोणती घोषणा होणार?

घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे

व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या सिलिंडरचे दर वाढवण्यात आले आहेत. हा सिलिंडर १४ रुपयांनी महागला आहे. मात्र घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९०२ रुपये, मुंबईत ९०२ रुपये ५० पैसे, कोलकात्यात ९२९ रुपये तर चेन्नईत ९१८ रुपये आहे. या दरांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही.

हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वापरतात. त्याचा घरगुती वापर करता येत नाही. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या वजनात फरक आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १९ किलो वजनाचा असतो आणि घरगुती एलपीजी सिलिंडर १४.२ किलो वजनाचा असतो.

सरकारी तेल कंपन्यांनी १ जानेवारी २०२४ रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती कमी केल्या होत्या. गेल्या महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत झालेली कपात अत्यंत किरकोळ होती. देशातील विविध शहरांमध्ये जानेवारी महिन्यात १९ किलोंच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत केवळ दीड रुपयांनी कमी झाली होती.