Mexican peso: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल लागत असताना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. ट्रम्प आघाडीवर असताना बाजूच्या मेक्सिको देशातील अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. मेक्सिकाचे चलन असलेला मेक्सिको पेसो डॉलरच्या तुलनेत घसरला आहे. ऑगस्ट २०२२ नंतर पहिल्यांदाच पेसो प्रति डॉलर २०.७०८० ने घसरले. निकाल लागल्यानंतर पेसो चलनात आणखी घसरण येऊ शकते, असे अर्थ विश्लेषकांचे म्हणणे आहे.

रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यास मेक्सिकोच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जाते. ट्रम्प सत्तेत आल्यास मेक्सिकोतून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढविले जाण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांचा विजय होणार असल्यामुळे पेसो चलनावर ताण निर्माण झाला आहे. जर कमला हॅरिस विजयी झाल्या असत्या तर प्रति डॉलर १९ पेसोवर पोहोचला असता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१६ साली जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला होता, तेव्हा पेसोची मोठी घसरण झाली होती. प्रतिडॉलर पेसो ८.५ टक्क्यांवर खाली आला होता.