मुंबई : प्राथमिक बाजारातून विद्यमान डिसेंबर महिन्यात १२ कंपन्यांनी प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून ८,९३१.६९ कोटी रुपये उभारले, ज्यामुळे हा गेल्या दोन वर्षांतील ‘आयपीओ’साठी सर्वोत्तम महिना ठरला आहे. लघु व मध्यम अर्थात एसएमई कंपन्यांकडून याआधी वर्ष २०२१ मध्ये एका महिन्यात ११ कंपन्यांनी ‘आयपीओ’द्वारे ९,५३४ कोटी रुपये जमा केले होते.

हेही वाचा >>> डीमॅट आणि म्युच्युअल फंड नामनिर्देशनसाठी जून २०२४ पर्यंत मुदतवाढ

Poonawala Fincorp posts highest quarterly net profit at Rs 332 crore
पूनावाला फिनकॉर्पचा ३३२ कोटींचा सर्वोच्च तिमाही निव्वळ नफा
infosys profit rs 7969 crore in fourth quarter
इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
bse listed companies marathi news
गुंतवणूकदार ४०० लाख कोटींचे धनी

चालू आठवड्यात सहा कंपन्यांचे समभाग भांडवली बाजारात सूचिबद्ध झाले. तर एक कंपनी गुरुवारी बाजारात पदार्पण करणार आहे. मंगळवार आणि बुधवारी प्रत्येकी तीन कंपन्यांनी शेअर बाजारात पदार्पण केले. मुत्थूट मायक्रोफिन, मोतीसन्स ज्वेलर्स आणि सूरज इस्टेट डेव्हलपर्सचे समभाग मंगळवारी सूचिबद्ध झाले, तर क्रेडो ब्रँड्स, हॅपी फोर्जिंग्ज आणि आरबीझेड ज्वेलर्स यांनी बुधवारी पदार्पण केले. या महिन्याच्या सुरुवातीला, डोम्स इंडस्ट्रीज, फ्लेअर रायटिंग, इंडिया शेल्टर फायनान्स आणि आयनॉक्स सीव्हीए सूचिबद्ध झाले, तर आझाद इंजिनीअरिंगचा समभाग गुरुवारी सूचिबद्ध होईल. तर ‘आयपीओ’च्या माध्यमातून ५७० कोटी रुपये जमवणाऱ्या इनोव्हा कॅपटॅबच्या पदार्पणाची तारीख निश्चित झालेली नाही. यापैकी डोम्स इंडस्ट्रीज, फ्लेअर रायटिंग, इंडिया शेल्टर फायनान्स आणि आयनॉक्स, मोतीसन्स ज्वेलर्स आणि हॅपी फोर्जिंग्ज यांनी पदार्पणात गुंतवणूकदारांच्या पदरी दोन अंकी परतावा दिला. आयपीओच्या माध्यमातून डोम्स इंडस्ट्रीजने १,२०० कोटी तर फ्लेअरने ५९३ कोटी आणि इंडिया शेल्टर फायनान्सने १,२०० कोटी उभारले. आयनॉक्स सीव्हीएने १,४५९.३२ कोटी, मुथूट मायक्रोफिनने ९६० कोटी रुपये मिळवले. तर मोतीसन्स ज्वेलर्सने १५१ कोटी रुपये, सूरज इस्टेट डेव्हलपर्सने ४०० कोटी , क्रेडो ब्रँड्स ५४९.७७ कोटी, हॅपी फोर्जिंग्स १,००८.६, आरबीझेड ज्वेलर्स १०० कोटी आणि आझाद इंजिनीअरिंग ७४० कोटी रुपयांचा निधी उभारला.