विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPIs) भारतीय शेअर बाजारावर विश्वास कायम आहे. जुलैमध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात निव्वळ आधारावर ४३,८०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. देशातील मजबूत आर्थिक मूलभूत तत्त्वे, कंपन्यांचे चांगले परिणाम आणि चिनी अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने यामुळे FPI भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक वाढवत आहेत. स्टॉक मार्केटमधील FPI गुंतवणूक या वर्षात आतापर्यंत १.२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, असंही डिपॉझिटरी डेटामध्ये आहे. भारतीय बाजारातील एफपीआयचा प्रवाह मजबूत आणि व्यापक आहे, असंही बाजार विश्लेषकांना वाटते.

वाढते मूल्यांकन ही चिंताजनक बाब

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही. के.विजयकुमार म्हणाले, “चिंतेची एकमेव गोष्ट म्हणजे वाढत्या मूल्यांकनाची आहे. यामुळे बाजारात मोठी ‘करेक्शन’ येऊ शकते.

हेही वाचाः डी मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी ‘हेल्थ अँड ग्लो’चे केले अधिग्रहण; आता नायकासारख्या ब्रँडशी स्पर्धा करणार

भारतीय शेअर बाजार आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला

“भारतीय शेअर बाजारांनी FPIs च्या सततच्या ओघामुळे सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत मध्यंतरी काही प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही”, असंही मॉर्निंगस्टार इंडियाचे असोसिएट डायरेक्टर-मॅनेजर रिसर्च हिमांशू श्रीवास्तव म्हणालेत.

हेही वाचाः ‘या’ भारतीयाने लंडनमध्‍ये खरेदी केलं सर्वात महागडं घर, दिसायला राजवाड्यापेक्षाही कमी नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलग तिसऱ्या महिन्यात गुंतवणुकीने ४० हजार कोटींचा टप्पा ओलांडला

आकडेवारीनुसार, मार्चपासून FPIs भारतीय शेअर बाजारात सातत्याने गुंतवणूक करीत आहेत. त्यांनी या महिन्यात २१ जुलैपर्यंत ४३,८०४ कोटी रुपयांचा साठा केला आहे. शेअर्समधील एफपीआय गुंतवणुकीचा आकडा ४०,००० कोटींच्या पुढे गेल्याचा हा सलग तिसरा महिना आहे. FPIs ने मे महिन्यात ४३,८३८ कोटी रुपयांची आणि जूनमध्ये ४७,१४८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. शेअर्स व्यतिरिक्त FPIs ने देखील कर्ज किंवा बाँड मार्केटमध्ये २,६२३ कोटी रुपये ठेवले आहेत.