संपूर्ण जगात एकापेक्षा एक राजा आणि सम्राट झालेत. पण काही मोजकेच राजे आहेत, ज्यांची जगभरात चर्चा आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका राजाबद्दल सांगणार आहोत, ज्याच्याबद्दल जाणून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. हा थायलंडचा राजा रामा एक्स आहे. त्याचे खरे नाव किंग महा वजिरालोंगकॉर्न (Thailand’s King Maha Vajiralongkorn) आहे. त्याच्याकडे केवळ अफाट संपत्तीच नाही, तर मोठ्या प्रमाणात विमाने आणि शेकडो आलिशान वाहनेसुद्धा आहेत. चला तर या राजाबद्दल जाणून घेऊयात.

विमानापासून सोन्याच्या बोटीपर्यंत संपत्ती

राजा महा वजिरालोंगकॉर्न यांच्याकडे जवळपास ३८ विमाने आहेत. त्यांच्याकडे ५२ सोन्याच्या बोटी आणि ३०० कारचा मोठा संग्रह आहे. जगातील सर्वात श्रीमंत राजांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट असून, त्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे.

हेही वाचाः Money Mantra : तरुण गुंतवणूकदारांसाठी ५ आवश्यक गुंतवणुकीचे मंत्र, आजच फॉलो करा अन् बना श्रीमंत

राजा महा वजिरालॉन्गकॉर्न यांची निव्वळ संपत्ती किती?

राजाच्या कुटुंबाकडे ३.२ लाख कोटींहून अधिक संपत्ती असल्याचं सांगण्यात येत आहे. राजाकडे १६,२१० एकर जमीन असल्याचेही सांगितले जाते. त्यांच्याकडे अनेक हेलिकॉप्टरही आहेत. राजाच्या संपत्तीबद्दल ऐकून लोकांना धक्का बसतो.

हेही वाचाः Money Mantra : चेकवर सही करताना ‘या’ १० चुका टाळा अन्यथा मोठे नुकसान

जगातील दुर्मीळ हिरा

५४५.६७ ब्राऊन गोल्डन ज्युबिली डायमंड थायलंडच्या राजाच्या मुकुट दागिन्यांमध्ये सेट आहे. हा जगातील दुर्मीळ हिरा असल्याचे म्हटले जाते. हा जगातील सर्वात मोठा आणि महागडा हिरा असल्याचे सांगितले जाते. डायमंड प्राधिकरणाने त्याची किंमत ९८ कोटी रुपये मोजली आहे.

कोट्यवधी रुपये इंधनावर खर्च केले जातात

थायलंडच्या राजाकडे एअरबस विमानांपासून सुखोई सुपरजेट्सपर्यंत सर्व काही आहे. विशेष बाब म्हणजे विमानाच्या इंधन आणि देखभालीवर दरवर्षी ५२४ कोटी रुपये खर्च केले जातात. थायलंडच्या राजाकडे जितकी संपत्ती आहे तितकेच त्याचे छंदही जास्त आहेत.

राजाचा राजवाडा

थायलंडच्या राजाचा रॉयल पॅलेस ग्रँड पॅलेस २३,५१,००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. हे १७८२ मध्ये पूर्ण झाले आहे, राजा रामा एस शाही राजवाड्यात राहत नाही. या महालात अनेक सरकारी कार्यालये आणि संग्रहालये आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वात मोठा बँक हिस्सा

थायलंडची दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या सियाम कमर्शियल बँकेत राजा महा वजिरालोंगकॉर्न यांची २३ टक्के भागीदारी आहे. तसेच देशातील सर्वात मोठा औद्योगिक समूह असलेल्या सियाम सिमेंट समूहाची ३३.३ टक्के भागीदारी आहे.