नोकऱ्यांसाठी आपल्यापैकी जवळपास सगळ्यांनीच मुलाखत, चर्चा, पगाराची अपेक्षा वगैरे सगळे रीतसर सोपस्कार पार पाडले असतील. मात्र, आपल्या कंपनीत मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांपैकी ८० टक्के उमेदवार त्यांच्या पगाराबद्दल किंवा त्यांच्या आधीच्या अनुभवाबद्दल खोटं सांगतात, असा दावा PhysicsWalla च्या एचआर विभागाचे प्रमुख सतीष खेंगरे यांनी केला आहे. यासाठी त्यांनी वापरलेल्या एका सॉफ्टवेअरच्या माहितीचा दाखला दिला आहे. मनीकंट्रोलनं ईटीएचआरवर्ल्डच्या दाखल्यानं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

उमेदवारांच्या पार्श्वभूमीची तपासणी

या वृत्तानुसार PhysicsWalla यासाठी उमेदवारांच्या पार्श्वभूमीची तपासणी करत आहे. त्यासाठी एका सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येतो. यातून त्यांच्या पार्श्वभूमीसोबतच उमेदवारांचे बँक अकाऊंट डिटेल्सही तपासले जातात, असं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

Money Mantra: घर विकल्यावर मिळणाऱ्या पैशांवर कर लागू होतो?

“कधीकधी उमेदवारांकडून आपल्या प्रश्नांना दिली जाणारी उत्तरं खरी नसतात. ते त्यांच्या कामगिरीसंदर्भातील प्रश्नांवरही खोटं बोलू शकतात. अशा परिस्थितीत त्यांच्या उत्तरांचा खरे-खोटेपणा तपासण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकतं. PhysicsWalla डार्विनबॉक्स नावाच्या तंत्रज्ञानाचा यासाठी वापर करतं. यातून कंपनीला कर्मचाऱ्यांसाठी टार्गेट, कामाचं मूल्यमापन, त्यांच्या कामासाठी मानांकन आणि ठरवलेलं ध्येय व गाठलेलं ध्येय यातील तफावत अशा गोष्टींचं मापन करता येतं”, अशी प्रतिक्रिया सतीश केंगरेंनी इटीएसआरवर्ल्डला दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

PhysicsWallaकडून त्यांच्या कंपनीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आल्याचं सांगण्यात आलं आहे.