नवी दिल्ली : दिवाळखोरी आणि नादारी प्रक्रियेअंतर्गत निराकरण प्रक्रिया सुरू असलेल्या जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडचे (जेएएल) अधिग्रहण करण्यास अदानी समूह उत्सुक आहे, असे सूत्रांनी बुधवारी स्पष्ट केले. सीमेंट, वीज, हॉटेल्स, बांधकाम आणि गृह निर्माण व्यवसायांमध्ये कार्यरत असलेल्या जेपी समूहाच्या या प्रमुख कंपनीवर कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू करण्यास न्यायालयाने परवानगी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळखोरी प्रक्रियेद्वारे जेएएलचे अधिग्रहण करण्यासाठी अदानी समूहाने इरादा पत्र (ईओआय) सादर केले आहे. दिवाळखोरी प्रक्रियेद्वारे जेएएलच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव हा संपूर्ण कंपनीसाठी मागविला जाणार आहे, तिच्या वेगवेगळ्या व्यवसायिक क्षेत्रांचे विभाजन करून प्रस्ताव मागवले जाणार नाहीत, असे या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) निर्देश दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२० फेब्रुवारी २०२५ अखेर बँका आणि वित्तीय संस्थांकडून जेएएलने घेतलेने एकूण थकित कर्ज ५५,४९३.४३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. देणेकऱ्यांच्या संघाने त्यांचे थकित कर्ज नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेकडे (एनएआरसीएल) हस्तांतरित केले आहे, अशी माहिती कंपनीने अलीकडेच दिली. या संघात स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, ॲक्सिस बँक, एलआयसी, कॅनरा बँक आणि इतर बँका व वित्तीय संस्थांचा समावेश आहे. एनएआरसीएलला हस्तांतरित केलेल्या कर्जाची एकूण रक्कम मात्र उघड करण्यात आलेली नाही.