अब्जाधीश उद्योगपती गौतम अदाणी यांच्या नेतृत्वाखालील अदाणी समूह २०२७ पर्यंत १० गिगावॅट क्षमतेची एकात्मिक सौर उत्पादन क्षमता तयार करण्याची योजना आखत आहे, जेणेकरून कंपनी ऊर्जा क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा फायदा घेऊ शकेल. कंपनीच्या जवळच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, अदाणी समूहाची सौरऊर्जा उत्पादन क्षमता ४ गिगावॅट आहे. तसेच अदाणी सोलरने पुष्टी केली आहे की, त्यांच्याकडे ३००० मेगावॅटच्या निर्यात ऑर्डर आहेत, जी पुढील १५ महिन्यांत पूर्ण होणार आहे.

हेही वाचाः TATA समूहाच्या ‘या’ १२ शेअर्सनी कमावला प्रचंड नफा, ६ महिन्यांत दिला १५० टक्क्यांपर्यंतचा परतावा

अदाणी समूहाने ३९४ दशलक्ष डॉलर जमा केले

अलीकडेच अदाणी समूहाने सोरल मॅन्युफॅक्चरिंगसाठी बार्कलेज पीएलसी आणि ड्यूश बँक एजीकडून ३९४ दशलक्ष डॉलर जमा केले आहेत. भारताची सौर ऊर्जा उत्पादन क्षमता जुलै २०२३ पर्यंत ७१.१० गिगावॅटपर्यंत वाढली आहे, जी मार्च २०१४ मध्ये २.६३ गिगावॅट होती. मात्र, भारताची सौरऊर्जा निर्मिती क्षमता अजूनही तुलनेत खूपच कमी आहे.

हेही वाचाः महिंद्रा अँड महिंद्राचा महिलांसाठी विशेष उपक्रम, मिळणार पाच वर्षांची मॅटर्निटी लीव्ह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अदाणी सोलर झपाट्याने उत्पादन क्षमता वाढवत आहे

अदाणी सोलरने २०१६ मध्ये उत्पादन सुरू केले. त्यावेळी कंपनी १.२ गिगावॅट सेल आणि मॉड्यूल्स तयार करत होती. गेल्या सहा वर्षांत कंपनीने तिची क्षमता ३ पट वाढवून ४ गिगावॅट मॉड्यूल आणि ४ गिगावॅट सेल केली आहे. भारतातील सर्वात मोठा सोलर पीव्ही सेल आणि मॉड्यूल निर्मिती क्षमता मुंद्रा SEZ मध्ये अदाणी समूहाने स्थापित केली आहे. अदाणी सोलरने जगाबरोबर भारतातून आतापर्यंत ७ गिगावॅट मॉड्युलची विक्री केली आहे.