scorecardresearch

Premium

OCCRP च्या अहवालातील गौप्यस्फोटावर अदाणी समूहाची प्रतिक्रिया, आरोपांचे खंडन करत म्हणाले…

निवेदनात पुढे म्हटले आहे की, “चालू असलेल्या नियामक प्रक्रियेचा आदर करणे महत्त्वाचे आहे. कायद्याच्या योग्य प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला आमचे खुलासे आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स मानकांच्या गुणवत्तेवर विश्वास आहे.

Adani Green advisor
(फोटो क्रेडिट- प्रातिनिधिक छायाचित्र)

अदाणी समूहाने ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) द्वारे गुपचूप विदेशी गुंतवणूकदारांनी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. अदाणी समूहानं एक निवेदन जारी केले आहे. “हिंडनबर्गच्या बदनाम अहवालाची पुनर्रचना करण्यासाठी परदेशी मीडियाला हाताशी धरून जॉर्ज सोरोस-फंडेड OCCRP द्वारे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आल्याचे दिसतेय. खरं तर आम्हाला हीच अपेक्षा होती.” विशेष म्हणजे गेल्या आठवड्यापूर्वीही माध्यमांनी अशीच भीती व्यक्त केली होती…” अदाणी समूहाने सांगितले की, स्वतंत्र निर्णय घेणारे प्राधिकरण आणि अपिलीय न्यायाधिकरण या दोघांनीही मूल्यांकन वाढलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे आणि व्यवहार लागू कायद्यांनुसार झाल्याचं सांगितलं आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, “चालू असलेल्या नियामक प्रक्रियेचा आदर करणे महत्त्वाचे आहे. कायद्याच्या योग्य प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला आमचे खुलासे आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स मानकांच्या गुणवत्तेवर विश्वास आहे. या तथ्यांच्या उजेडात अहवालाची वेळ संशयास्पद आणि दुर्भावनापूर्ण आहे आणि आम्ही हा अहवाल स्पष्टपणे नाकारतो.” सर्वोच्च न्यायालयाने अदाणी समूहाच्या बाजूने निर्णय दिला आहे आणि मार्च २०२३ मध्ये प्रकरण बंद करण्यात आले. अदाणी समूहाच्या म्हणण्यानुसार, ” कोणतेही अति मूल्यांकन आढळले नसल्यामुळे पैशाच्या व्यवहारासंबंधीच्या या आरोपांना कोणताही संबंध किंवा आधार नाही.”

Chatgpt
विश्लेषण : रिअल टाइम अपडेट, संवाद आणि बरेच काही… अद्ययावत चॅटजीपीटी किती उपयुक्त?
paneer paratha recipe
Paneer Paratha : हेल्दी ब्रेकफास्ट करायचाय? मग बनवा पौष्टिक पनीर पराठा; सोपी रेसिपी लगेच नोट करा
Pears help to control blood sugar and aid weight loss
नाशपती खा, वजन कमी करण्यापासून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत मिळतील हे फायदे; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
car testing dummy lady
मोटार अपघाताबाबतच्या सुरक्षा टेस्टिंगमध्ये स्त्री डमी वापरूनही अभ्यास!

हेही वाचाः अदाणींच्या शेअर्सबाबत OCCRP च्या अहवालात मोठा गौप्यस्फोट, ‘ओपेक फंड’चा वापर करून…

OCCRP ने केलेले हे दावे “एक दशकापूर्वी बंद प्रकरणांवर आधारित आहेत, जेव्हा महसूल गुप्तचर संचालनालयाने ओव्हर इनव्हॉइसिंग, परदेशात निधी हस्तांतरित करणे, संबंधित पक्ष व्यवहार आणि FPIs द्वारे गुंतवणूक केल्याच्या आरोपांची चौकशी केली होती.” “अदाणी समूहाने आधीच स्पष्ट केले आहे की, FPIs सुरुवातीपासूनच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) तपासणीचा भाग आहे.

सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या मते, किमान शेअरहोल्डिंग आवश्यकतांचे उल्लंघन किंवा शेअर्सच्या किमतीत फेरफार केल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. “आम्हाला प्रश्न विचारणाऱ्या प्रकाशनांनी आमचा प्रतिसाद आणि बाजू पूर्णपणे प्रकाशित केली नाही हे दुर्दैवी आहे. इतर गोष्टींबरोबरच हे प्रयत्न आमच्या शेअर्सच्या किमती कमी करून नफा मिळवण्याच्या उद्देशाने आहेत आणि लहान विक्रेत्यांना लक्ष्य केले जात असून, त्यांची अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जात आहे.”

हेही वाचाः रिलायन्सच्या एजीएममध्ये नीता अंबानींच्या साडीने वेधले सगळ्यांचे लक्ष, भारताच्या पारंपरिक कारागिरीचे अतुलनीय उदाहरण

अदाणी समूहाने OCCRP चे आरोप फेटाळले

OCCRP ने दोन विदेशी गुंतवणूकदारांद्वारे इनसाइडर ट्रेडिंगचा आरोप केला आहे
हे आरोप जुने आणि रिसायकल केले गेले आहेत : अदाणी
न्यायालयीन तपासात काहीही चुकीचे आढळले नाही: अदाणी
सेबी आधीच या परदेशी गुंतवणूकदारांची चौकशी करीत आहे: अदाणी
SC समितीच्या चौकशीत शेअरहोल्डिंग नियमांचे कोणतेही उल्लंघन आढळले नाही: अदाणी
SC , सेबी तपासाचा आदर केला पाहिजे: अदाणी
हा अहवालातून पुन्हा एकदा पैसे कमविण्याचा प्रयत्नः अदाणी
अनेक एजन्सी या शॉर्ट सेलरची चौकशी करीत आहेत: अदाणी
दुःख आहे की, मीडिया रिपोर्ट्समध्ये आमची बाजू देण्यात आली नाही : अदाणी

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Adani group reacts to occrp report leak denies allegations vrd

First published on: 31-08-2023 at 11:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×